34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरविशेषरेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर

रेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर

Related

सार्वजनिक थुंकल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही अनेक नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय अजूनही सुटलेली दिसून येत नाही. रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्ते आदी ठिकाणी नागरिक सर्रास थुंकताना दिसून येतात. त्यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वेने पर्यावरणपूरक पिकदानी पाकिटे (स्पिटून पाऊच) आणली आहेत. देशातील ४२ स्थानकांवर व्हेंडिंग मशिनच्या मार्फत पाच ते १० रुपयांमध्ये ही पाकिटे उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे स्थानक आणि परिसरात नागरिक थुंकल्यामुळे त्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी तसेच डाग साफ करण्यासाठी रेल्वेला वर्षाला सुमारे १२०० कोटी इतका खर्च येत असतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वने पिकदानी पाकिटांची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम, मध्य आणि उत्तर या रेल्वेच्या तीन झोनमध्ये पिकदानी पाकिटे संकल्पना राबविब्यासाठी ‘ईझीस्पिट’ या स्टार्टअप कंपनीला ठेका देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर गुन्हे दाखल!

ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!

न्हावा शेवा बंदरात सापडलेले २५ किलो हेरॉइन आले अफगाणिस्तानातून

गुटखा खाण्याबद्दल दंड वसूल करणारा निघाला तोतया पालिका कर्मचारी

प्रवाशांना हे पिकदानी पाकीट खिशात ठेवता येणार असून गरज असेल तेव्हा त्याचा वापर करता येऊ शकतो. या पाकिटामध्ये मॅक्रोमोलेक्युल्स पल्स तंत्राचा वापर करण्यात आला असून यातील रसायन लाळेतील जीवाणू आणि विषाणूंसह घट्ट होते. तसेच हे पाकीट पर्यावरणात नष्ट होऊ शकते आणि त्याचा वापर १५ ते २० वेळा करता येऊ शकतो. यात थुंकीचे रुपांतर घन स्वरूपात होते. वापर झाल्यानंतर या पाकिटांना मातीत फेकल्यावर त्यांचे पूर्णपणे विघटन होते.

‘मध्य, पश्चिम , उत्तर रेल्वेच्या ४२ स्थानकांवर ‘ईझीस्पिट’ व्हेंडिंग मशीन बसविण्यासाठी भारतीय रेल्वेशी करार केला आहे. काही स्थानकांवर ही मशीन बसवण्यास सुरुवात केली आहे,’ असे ‘ईझीस्पिट’च्या सहसंस्थापक रितू मल्होत्रा यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा