27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरविशेष83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या

83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या

Related

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित सर्व माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतोच आणि आता त्याच्यासह त्याच्या चाहत्यांना आणि चित्रपट रसिकांना वेध लागले आहेत ते आगामी ’83’ या चित्रपटाचे आणि या चित्रपटाचा ट्रेलर हा आज यूट्यूब द्वारे प्रदर्शित करण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या ट्रेलरची वाट बघत होते आणि अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली. रणवीरने इंस्टाग्रामवर काहीच दिवसांपूर्वी ’83’  चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले होते आणि हे पोस्टर प्रत्येक सिनेरसिकाच्या आणि कलाकारांच्या चर्चेचा विषय बनले.त्या पोस्टरमध्ये संपूर्ण टीम रणवीरच्या मागे धावताना दिसत आहे. पोस्टर शेअर केल्यानंतर त्याला पाच तासातच ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.

पोस्टरप्रमाणेच या ट्रेलरचीही चर्चा सगळीकडे आहे. आतापर्यंत या ट्रेलरला १ कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ६० हजारपेक्षा जास्त लाईक्स यूट्यूबवर मिळाले आहेत. ट्रेलरची सुरवातच भारत आणि झिंबाब्वे यांच्यातील त्या सामन्याने होते ज्यामध्ये कपिल देव यांनी १७५ धावांची खेळी करून झिंबाब्वेच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्या सामन्यावेळी ड्रेसिंग रूम मधली काय स्थिति होती हेही या ट्रेलरच्या माध्मयातून दाखवण्यात आले आहे. ट्रेलरच्या पहिल्या भागात भारतीय संघाचा संघर्ष दाखवला आहे तर ट्रेलरच्या शेवटच्या मिनिटांमध्ये त्या संघर्षातून बाहेर येणार, संघर्षावर मात करणारा १९८३ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघ दाखवला आहे. ट्रेलरमधून या चित्रपटात रणवीर सिंग सोबतच इतर कोणाच्या भूमिका आहेत आणि कोणता नट कोणची भूमिका साकारतो आहेत हे देखील दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणचा लूकही या ट्रेलर मधून दाखवला आहे.

पहा ट्रेलर:

भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्या विजयाच्या कथेवर ’83’ हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा दिलेल्या आठवड्यात प्रदर्शित केला आणि आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती २४ डिसेंबरची कारण याच दिवशी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा