30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषजिओची मोबाईल सेवा ठप्प; इंटरनेट मात्र सुरु

जिओची मोबाईल सेवा ठप्प; इंटरनेट मात्र सुरु

युजर्सकडून तक्रारी

Google News Follow

Related

रिलायन्स जिओ या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीची सेवा मंगळवारी ठप्प झाली. यूजर्सना कॉलिंगपासून मेसेजिंगपर्यंत समस्या येत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की जिओच्या सेवा सोमवारी रात्रीपासून बंद झाल्या आहेत. सोशल मीडियावर युजर्सही याबाबत तक्रारी करत आहेत. परंतु यूजर्सना मोबाइल इंटरनेट वापरता येत आहें

सेवा बंद पडल्याने अनेक जिओ युजर्स कॉल करू शकत नाहीत किंवा प्राप्त करत नाहीत. एसएमएसचा वापरही त्यांना करता येत नाहीये परंतु बरेच युजर्स कॉल करण्यास सक्षम आहेत. याआधीही जिओच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. यूजर्सच्या कॉलिंग आणि एसएमएस सेवा तीन तास प्रभावित झाल्या होत्या. तथापि, त्यानंतरही वापरकर्ते मोबाइल डेटा सेवा वापरण्यास सक्षम होते.

आज सकाळपासूनच वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवर यूजर्स याबाबत तक्रार करत आहेत. अनेक युजर्स जिओच्या सेवेबाबत मीम्सही शेअर करत आहेत. एका यूजर्सने , #Jiodown स्थिती जेव्हा तुमच्याकडे Jio Fiber, Jio SIM आणि Jio Mobile असेल आणि नेटवर्क बंद असेल असे मीम्ससह लिहिले आहे. जिओ डाऊन होताच यूजर्सने ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली. वापरकर्त्यांच्या मते, वापरकर्त्याच्या फोनमध्ये VoLTE सिग्नल दिसत नाही आणि ते कॉल करू शकत नाहीत.

हे ही वाचा : 

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

लोकांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. ज्यांना तातडीचे कॉल करावे लागले त्यांनाही कॉल करणे अशक्य झाले आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधून जिओ आउटेजची नोंद झाली आहे. चाचणीमध्ये असे आढळून आले की काही नंबर कनेक्ट होत आहेत तर काही नेटवर्क बाहेर सांगत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा