30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषसदैव अटल: श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचे पुण्यस्मरण

सदैव अटल: श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचे पुण्यस्मरण

Google News Follow

Related

आज भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख भारताला कणखर पंतप्रधान म्हणून तर आहेच, परंतु आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयीच्या काही बाबींची माहिती करून घेऊ.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतात ग्वाल्हेर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते.

राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलरामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्यांची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

पुढे कालौघात स्थापन झालेले जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले.

हे ही वाचा:

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?

नंतरच्या काळात भाजपाचे यश वाढते राहिले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होऊ शकले. अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले. यापैकी पहिली खेप केवळ १३ दिवसांची राहिली होती. दुसऱ्या खेपेला वाजपेयींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. या काळात त्यांनी पोखरणची दुसरी अणुचाचणी केली, त्याबरोबरच पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली- लाहोर बस सेवा सुरू केली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पहिल्या बसने लाहोरला चर्चेसाठी गेले होते. सर्वात महत्त्वाचे असे कारगील युद्ध याच काळात लढले गेले.

तिसऱ्या खेपेला त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. तिसरा कार्यकाळ १९९९- २००४ असा राहिला होता. या काळात अतिरेक्यांनी एअर इंडियाच्या आयसी-१८४ या विमानाचे अपहरण केले. त्यावेळी तीन अतिरेक्यांच्या बदल्यात या विमानाची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर २००१ मध्ये संसदेवर देखील हल्ला करण्यात आला होता.

भारताच्या विकासात वाजपेयींचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी दूरध्वनी क्रांती घडवून आणली. ज्यामुळे दूरसंचार क्षेत्र भारतात विकसित होऊ शकले. त्याबरोबरच त्यांनी ‘सुवर्ण चतुष्कोन’ योजना मांडून मुंबई- दिल्ली- कोलकता- चेन्नई शहरांना जोडण्यास सुरूवात केली. त्याबरोबरच त्यांनी सरकारी अर्थसंकल्पातील तूटीचा टक्का निश्चित केला. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी अधिक गुंतवणुक करणे शक्य होऊ लागले. वाजपेयींनी भारताला अणुक्षेत्रात देखील प्रगतीपथावर नेले. वाजपेयींनी सर्व शिक्षा अभियान चालू केले.

अटल बिहारी वाजपेयी हे एक उत्तम कवी होते. त्यांनी अनेक उत्तमोत्तम कविता लिहील्या होत्या. त्याबरोबरच त्यांचे विरोधक देखील त्यांना उत्तम संसदपटू म्हणून ओळखतात. त्यांना अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जाते. त्यांचा मृत्यु १६ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा