उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे. तीन वर्षांपूर्वी टिकैतनगर पोलिस ठाणे क्षेत्रातील रिंकू रावत या युवकाने अयोध्येतील मुस्लिम युवती साहिबा हिच्याशी निकाह केला होता. निकाहनंतर रिंकूने इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव ‘इसरार’ असे ठेवले होते. इतकेच नव्हे, तर युवतीचे वडील अनवर यांनी त्याचे खतना (सुंता) केल्याचे समजते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, निकाहनंतर रिंकू आणि साहिबा दोघेही एकत्र राहू लागले आणि त्यांना दोन मुले झाली. इसरार धर्मपरिवर्तनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेकदा रामसनेहीघाट तहसील कार्यालयात गेला होता. काही दिवसांपूर्वी साहिबा देखील त्याच कामासाठी तहसील कार्यालयात पोहोचली असता, तेथे उपस्थित एका वकिलामार्फत विश्व हिंदू परिषद (VHP) कार्यकर्त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली.
विहिंपचा हस्तक्षेप आणि ‘घरवापसी’
यानंतर विहिंपचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी रिंकू आणि साहिबा या दोघांची ‘घरवापसी’ केल्याचे सांगितले जाते. ‘घरवापसी’च्या कार्यक्रमात बुर्का परिधान केलेल्या साहिबाला साडी परिधान करून हिंदू संस्कारांनुसार पुन्हा विवाह लावण्यात आला.
हे ही वाचा :
भारतीय सैन्याचा ‘त्रिशूल’ आणि हाफिज सईद घाबरला; लाहोरमध्ये होणारी परिषद पुढे ढकलली
महाआघाडी सत्तेत आल्यास एकाहून अधिक उपमुख्यमंत्री असतील, ज्यात एक मुस्लिम असेल
आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन
राष्ट्र उभारणीत गुंतलेल्या आरएसएसवर बंदी घालून काय साध्य होईल?
या वेळी दोघांचे ‘शुद्धिकरण संस्कार’ करण्यात आले. साहिबाचे नाव बदलून ‘शांती देवी’, तर इसरारचे पुन्हा ‘रिंकू रावत’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या दोन मुलांचीही नावे बदलण्यात आली, मोठ्या मुलाचे नाव रामप्रकाश आणि लहान मुलाचे श्यामप्रकाश असे ठेवण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.







