मतदारयाद्यांमधील घोळासंदर्भात महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने मूक आंदोलन छेडले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात अशा सगळ्या प्रमुख नेत्यांनी भाग घेत या मोर्चातून निवडणूक प्रक्रियेत असलेल्या घोळाबाबत टीका केली. त्याचवेळी भाजपाकडून विरोधकांचे हे कारस्थान असल्याची टीका केली गेली.

दुबार मतदारांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला तर मतचोरी दिसल्यावर तिथेच ठोकून काढा अशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीचा मोठा गठ्ठा तिथे आणला. उद्धव
ठाकरे यांनी तर त्यांचे नाव मतदार यादीतून हटविण्याचा कुणीतरी प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट केला. कुणीतरी आपल्या नावाने अर्ज केल्याचे आणि त्यात खोटा फोन नंबर टाकल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
महाआघाडी सत्तेत आल्यास एकाहून अधिक उपमुख्यमंत्री असतील, ज्यात एक मुस्लिम असेल
आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन
इंग्रजी, हिंदी मुलांची प्रतिभा कमकुवत करत आहेत
बनावट इतिहासातून शनिवारवाड्यावर अतिक्रमण
भाजपाने केलेल्या मूक आंदोलनात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सत्याच्या मोर्चावर टीका केली. अनेक एनजीए या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असून विरोधकांचा कट हाणून पाडला पाहिजे असे चव्हाण म्हणाले.
चव्हाण म्हणाले की, विरोधकांकडून विकासाची चर्चा बंद आहे. राज्य गतिमान करण्याचे आमचे प्रयत्न आहेत पण काही एनजीओ मोठ्या प्रमाणावर फंडिंग करत विरोधकांना खतपाणी घालत आहेत. सत्याचा मोर्चा हा दिशाभूल करणारा मोर्चा आहे. असा मोर्चा काढण्याचा निर्धार मविआच्या घटकपक्षांनी महिन्याभरापूर्वीच केला होता, असेही ते म्हणाले.







