31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेष‘कदाचित माझा पाय कापावा लागला असता’

‘कदाचित माझा पाय कापावा लागला असता’

ऋषभ पंतने जागवल्या २०२२च्या अपघाताच्या आठवणी

Google News Follow

Related

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने सन २०२२मध्ये त्याच्या झालेल्या गाडीअपघाताच्या भयानक आठवणी पुन्हा जागवल्या. तो अपघात इतका भयानक होता की काही गंभीर परिस्थिती उद्भवली असती, जखमा आणखी चिघळल्या असत्या तर त्याचा उजवा पायच कापावा लागला असता, असे त्याने सांगितले. डिसेंबर २०२२मध्ये झालेल्या या अपघातात ऋषभला जबर जखमा झाल्या होत्या.

डिसेंबर २०२२मध्ये पंत हा दिल्लीतून त्याचे घर रूरकी येथे जात असताना त्याच्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता. तो गाडीमध्ये एकटाच होता. गाडी चालवताना व्हिलवर त्याचा दणका बसल्याने त्याची मर्सिडिज दुभाजकाला धडकली आणि गाडीला आग लागली. तेव्हा तेथून जाणाऱ्या स्थानिकांनी तसेच, एका बसचालकाने लगेचच त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला रूरकी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर

पेपरफुटी रोखणारे विधेयक सोमवारी संसदेत सादर होणार

यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

तीन कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’

या अपघातात पंत याला जबर दुखापत झाली. त्याचे कपाळ, उजवा पाय आणि पाठीला जबर दुखापत झाली होती. या सर्व जखमा भरून काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या. स्टार स्पोर्टला दिलेल्या माहितीत त्याने या अपघाताबद्दल विस्तृत माहिती दिली. त्याचा उजवा पाय निखळला होता आणि तो पूर्वपदावर नेणे आवश्यक होते. त्याने पाय पूर्वपदावर नेण्यासाठी मदतीच्या याचना केल्या. ‘पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे परिस्थिती बिघडली असती तर पाय कापण्याची वेळ आली असती. हे ऐकले तेव्हा भीतीने थरकाप उडाला होता,’ ऋषभ सांगतो. ‘त्याआधी मला अजिबात भीती वाटली नाही. कारण मी वेदनेने कळवळत होतो आणि माझ्या मनात केवळ तो एकच विचार होता,’ ऋषभने सांगितले.

‘गाडीचे मूळ रूपच बदलले’
अपघात झाल्यानंतर गाडीची अवस्था काय होती, याबद्दलही पंत बोलला. ‘मी त्यादिवशी एसयूव्ही घेऊन गेलो होतो. जेव्हा मी माझी गाडी पाहिली, तेव्हा ती तिच्या मूळ रूपात नव्हती. मी एसयूव्ही नेली होती आणि ती सेदानसारखी दिसत होती,’ असे ऋषभ हसतच सांगतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा