30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरविशेषमुख्यमंत्री शिंदेंविरोधातला 'रोखठोक लेख' राऊतांना भोवणार!

मुख्यमंत्री शिंदेंविरोधातला ‘रोखठोक लेख’ राऊतांना भोवणार!

पाठविली कायदेशीर नोटीस

Google News Follow

Related

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आरोप करणाऱ्या उबाठा नेत्याला महागात पडणार आहे.संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.तीन दिवसात माफी मग अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याची नोटीस उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना मुख्यमंत्री शिंदेंकडून पाठवण्यात आली आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेनी पैशांचा अफाट वापर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केला होता.प्रत्येक मतदार संघात शिंदेनी २५ ते ३० कोटी रुपयांचे वाटप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.या प्रकरणी मुखमंत्री शिंदेंकडून आता संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.३ दिवसात बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदेनी आपल्या वकिलामार्फत संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.गेल्या रविवारी संजय राऊतांनी आपल्या सामनाच्या सदरातून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खळबळ जनक दावे केले होते.संजय राऊतांच्या दाव्याबद्दलच ही नोटीस पाठवण्यात आली आहे.संजय राऊत यांनी तीन दिवसांत बिनशर्त माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे मुख्यमंत्री शिंदेंच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.माफी मागितली नाही तर संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा, अब्रुनुकसानीचा, फौजदारी दिवाणी खटला दाखल करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘आप’ने झटकले हात, “काँग्रेससोबतची आमची युती कायमची नाही!”

ब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित

‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!

सेलिब्रिटी मलायका, नोरा, समंथा, रकुलला आला गाझा पट्टीतील ‘राफा’चा पुळका

संजय राऊत यांनी सामनातून दावा केला होता की, मुख्यमंत्री शिंदेनी लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केला. अनेक मतदार संघात शिंदेनी २५-३० कोटी रुपये वाटले.तसेच अनेक उमेदवारांना पाडण्यासाठी वेगळं बजेट असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.अजित पवार यांचा उमेदवार निवडून येऊनये यासाठी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खास प्रयत्न केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.या प्रकरणी त्यांना आता मुख्यमंत्री शिंदेंकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील राऊतांनी आरोप केले होते.नितीन गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.तसेच फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा