28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषप्लेऑफ्स जागेसाठी रॉयल चॅलेंजर्सने बदलले रंग

प्लेऑफ्स जागेसाठी रॉयल चॅलेंजर्सने बदलले रंग

Related

बहुचर्चित अशा इंडियन प्रिमियर लीगमधील (IPL) आज, २१ मे रोजी अंतिम साखळी सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर यंदाच्या वर्षाचे प्ले ऑफ्सचे गणित सुटणार आहे. प्ले ऑफ्समधील चार जागांपैकी तीन जागा भरल्या असून आजच्या लढतीनंतर चौथ्या जागेचं कोडं सुटणार आहे. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांनी २०२२ च्या प्ले ऑफसाठी त्यांच्या तीन जागा बुक केल्या आहेत, फक्त एक जागा शिल्लक आहे आणि या जागेसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये चुरस असणार आहे.

प्ले प्लेऑफचं गणित लक्षात घेता आजचा सामना अधिक रंगतदार होणार असून दिल्ली आणि बंगळुरू दोन्ही संघांचे नशीब मुंबई संघाच्या हातात असणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे तर दिल्लीचा संघ १४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपुष्टात आलं असून आजच्या सामान्यानंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर कोणता संघ आपली जागा निश्चित करणार हे स्पष्ट होणार आहे.

आजच्या सामन्यांच गणित असं आहे की, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात दिल्लीचा विजय झाल्यास दिल्ली १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर जाणार आहे. शिवाय दिल्लीच्या संघाचा रन रेटही बंगळुरू संघापेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आजचा सामना जिंकून दिल्लीच्या संघाला हरवलं तर बंगळुरूचा संघ आता असलेल्या चौथ्या जागी राहून प्ले ऑफ्समध्ये जागा निश्चित करणार आहे. त्यामुळे आता बंगळुरूचा संघ मुंबई इंडियन्सला पाठींबा देण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे ही वाचा:

मी जिवंत आहे…हयात असल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा आटापीटा

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

सोशल मीडियावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या अकाऊन्टवरून सातत्याने मुंबईच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. #redturnsblue अशा हॅशटॅगसह मुंबई इंडियन्स संघाला पोस्ट कार्ड पाठवले आहे. आज संपूर्ण बंगळूरूचा संघ तुम्हाला पाठींबा देणार आहे. दिल्ली विरुद्ध उत्कृष्ट खेळ करा, असा संदेश या पोस्ट कार्डवर लिहिण्यात आला आहे.

त्यानंतर त्यांनी अकाऊन्टचं प्रोफाईल इमेज बदलून त्यांच्या संघाच्या लोगोच्या मागचा रंग लालच्या ऐवजी निळा करून मुंबई इंडियन्स संघाला पाठींबा दर्शवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसीस यानेही मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी चाहत्यांचे फोटोही पोस्ट करून म्हटलं आहे की, मुंबईने गेल्या अडीच महिन्यात आम्हाला पाठींबा दिला. त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आज बंगळुरू संघाचा प्रत्येक चाहता तुमच्या संघाला पाठींबा देईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावरून होणाऱ्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं असून यावरून अनेक मिम्सही बनायला लागले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा