29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेष‘सरसेनापती हंबीरराव’ सुपरहिट!

‘सरसेनापती हंबीरराव’ सुपरहिट!

Related

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे आणि नवनव्या कल्पना, नव्या धाटणीचे चित्रपट असे समीकरण बनले आहे. मुळशी पॅटर्न, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, देऊळबंद अशा चित्रपटानंतर आता इतिहासात डोकावणारा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांतच या चित्रपटाने कमाईचा एक विक्रम रचला आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने इतिहास रचत ८.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटातून बोकाळलेले शहरीकरण आणि त्यातून निर्माण होणारी गुंडगिरी, त्यांच्यातील टोळीयुद्ध या मुद्द्याला हात घालण्यात आला होता. त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली होती. त्यातील संवाद विशेषतः सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले गेले. त्याचा हिंदी भाषेतील रिमेक ‘अंतिम’ हा चित्रपटही येऊन गेला. नुकत्याच आलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटानेही लोकांची मने जिंकली आहेत. शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे.  अशा एकापेक्षा एक धडाकेबाज चित्रपाटांनंतर प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या चित्रपटातून उलगडली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. ‘फक्त तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास… फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे… असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा,’ असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता थिएटरकडे सिनेचाहत्यांचे पाय वळू लागले आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन तीन शो या चित्रपटाचे लागत आहेत. चित्रपटाबद्दल कुतुहल वाढू लागले आहे.

हे ही वाचा:

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत

समीर वानखेडेंची चेन्नईला बदली

स्वराज्याचे कर्तबगार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची गोष्ट सांगताना त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातल्या इतर शुरांच्या शौर्यगाथेलाही सिनेमात स्पर्श केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा