28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषसमीर वानखेडेंची चेन्नईला बदली

समीर वानखेडेंची चेन्नईला बदली

Related

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणामुळे चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आले आहे. समीर वानखेडे हे सध्या DGARM पदावर कार्यरत आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये समीर वानखेडे यांचे नाव आहे. चेन्नईच्या डीजीटीएस पदी त्यांची बदली करण्यात आली आहे.

आर्यन खान प्रकरणाच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील या ड्रग्ज प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर अनेक आरोप केले होते.

हे ही वाचा:

माजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी या प्रकरणात आर्यन खान याला क्लिन चिट देण्यात आली आहे. आर्यनसह सहा जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करता येईल, असे ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत, अशी माहिती देण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा