27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामामरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

Related

मुंबई येथील मरिन लाईन्स येथील समुद्रात एका इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. इसमाने समुद्रात उडी मारल्याचे कळताच तीन युवकांनी इसमाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

कमलेश जाधव ( ५३ ) असं या व्यक्तीचे नाव आहे. या इसमाने सोमवार, ३० मे रोजी मुंबईतील मरिन लाईन्स येथील समुद्रात उडी मारली. त्या इसमाला उडी मारल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी तीन युवक तात्काळ गेले. समुद्रातून त्या इसमाला या तीन युवकानानी सुखरूप बाहेर देखील काढले. त्यांनतर बाजूलाच असलेल्या गस्ती वरील पोलिसांनी त्वरित मदत करत गाडीतून एलिझाबेथ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परंतु, आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

राकेश टिकैतवर शाईफेक

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

‘घोडेबाजार करण्याचा प्रश्नच येत नाही’

दरम्यान, सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथील कुडासे गावात एका मामा भाचीचा नदीमध्ये बुडून मृत्य झाला आहे. २२ जणांचे पालयेकर कुटुंब साहिलीसाठी गेले होते. त्यावेळी नदीमध्ये पोहण्यासाठी कुटुंबातील काही सदस्य गेले. पोहण्यासाठी नदीत गेलेल्या सदस्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यावेळी १३ वर्षाची तनिषा पाण्यामध्ये गंटागळ्या घेऊ लागली म्हणून तिचा मामा तिला वाचवण्यासाठी गेला. त्या दोघं मामा भाचीला नातलगांनी नदीतून बाहेर काढले आणि रुग्णलयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा