28 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरक्राईमनामामाजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी

माजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी

Related

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात घुसून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज, ३० मे रोजी दुपारी डी पी सावंत यांच्या नांदेड येथील घरात घुसून दोन बंदुकधारी व्यक्तींनी ५० हजार रुपयांची मागणी करत नोकराला मारहाण केली. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

आज दुपारी डी पी सावंत हे आपल्या घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी दोन बंदुकधारी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपींनी सावंत यांच्या घरात घुसून ५० हजारांची मागणी केली. तसेच त्यांनी घरातील नोकराला मारहाण केली आहे. नोकराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घरातील गोंधळ ऐकून डी पी सावंत आपल्या खोलीतून बाहेर आले होते. यावेळी आरोपींनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून ५० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा:

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच एका आरोपीला अटक करण्यात यश आले असून अन्य एक आरोपी फरार आहे. हे आरोपी कोण होते? आणि सावंत यांच्या घरात का शिरले होते? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. भर दिवसा एका माजी मंत्र्याच्या घरात असा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणेमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,921अनुयायीअनुकरण करा
10,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा