28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरराजकारणआव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड

आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड

Related

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. आव्हाड यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून देताना पोलिस कर्मचा-याने एका कारचालकाला थप्पड लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. दौऱ्यादरम्यान, आव्हाड यांचा ताफा कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर पोहचला आणि अचानक वाहतूक कोंडी झाली. आव्हाड यांचा ताफा थांबल्यामुळे पोलिसांनी गाड्यांना बाजूला हटवण्यासाठी एकच धावपळ उडाली. आव्हाडांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क एका वाहनचालकाला थप्पड मारली आहे. त्यांनतर हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

UPSC परीक्षेत मुलींची बाजी

सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर गोल्डी ब्रार

राकेश टिकैतवर शाईफेक

…तर हिंदूंना देश उरणार नाही!

दरम्यान, वाहनचालकाला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आता संताप व्यक्त केला जात असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापुरात आज समोरासमोर भेट झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा