28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरदेश दुनियाकॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

Related

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील कॅनडा सरकारने सोमवार, ३० मे रोजी पिस्तूलची आयात, खरेदी किंवा विक्री मर्यादित करण्यासाठी विधेयक सादर केले आहे. “कॅनडामध्ये कुठेही पिस्तूल खरेदी करणे, विक्री करणे, हस्तांतरित करणे किंवा आयात करणे बेकायदेशीर ठरेल,” असे जस्टिन ट्रुडो म्हणाले.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी बऱ्याच काळापासून बंदुकीसंदर्भात कठोर कायदे आणण्याची योजना आखली होती. मात्र योजना अंमलात आणली नव्हती. परंतु या महिन्यात अमेरिकेतील उवाल्डे, टेक्सास आणि बफेलो येथे झालेल्या गोळीबारानंतर कॅनडामध्ये हा निर्णय घेतला आहे. यामध्ये बंदुकीसारख्या दिसणाऱ्या खेळण्यांवर देखील बंदी येणार आहे. नवीन कायदे काही खेळण्यांवर बंदी घालतील जे वास्तविक बंदुकांसारखे दिसतात, जसे की एअरसॉफ्ट रायफल असेही ते म्हणाले. बंदुकीचा हिंसाचार वाढत असल्याने नवीन उपाययोजनांची गरज असल्याचे ट्रुडो म्हणाले.

कॅनडाचे आपत्कालीन मंत्री बिल ब्लेअर म्हणाले, कॅनडा हा अमेरिकेपेक्षा खूप वेगळा देश आहे. कॅनडामध्ये बंदुकीची मालकी हा अधिकार नसून एक विशेषाधिकार आहे. आणि हेच तत्त्व कॅनडाला जगातील इतर अनेक देशांपेक्षा वेगळे करते. कॅनडामध्ये बंदुका फक्त शिकार आणि खेळासाठी वापरल्या जातात. मात्र त्या संदर्भात देखील योजना आखण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पोर्टापिक, नोव्हा स्कॉशिया येथे झालेल्या सामूहिक गोळीबार झाला होता. त्यांनतर कॅनडाने AR-15 रायफल सारख्या सुमारे १ हजार ५०० मॉडेल्सच्या प्राणघातक शस्त्रांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा