29 C
Mumbai
Sunday, June 19, 2022
घरराजकारणकाँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

Related

राज्यात राजकीय पक्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसपूस झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख हे काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं आशिष देशमुख म्हणाले आहेत.

आशिष देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात राज्यसभेसाठी अनेक सक्षम नेते आहेत. मात्र, तरीही महाराष्ट्राच्या नेत्याला उमेदवारी न देता बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजपा सोडून, आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीनी राज्यसभेचे आश्वासन दिल होत. परंतु, ते आश्वासन काँग्रेस पाळलं नाही, असं देशमुख म्हणाले आहेत.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशातून फक्त दोन आमदार निवडून आले आहेत. अशा राज्यातून इम्रान खान उर्फ प्रतापगडी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी अशा तीन नेत्यांना राज्यसभेवर पाठवणे हे कितपत योग्य आहे? असा सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत

इम्रान प्रतापगडी हे महाराष्ट्र कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते उत्तर प्रदेश मधील मुस्लिम चेहरा असून, उर्दू कवी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यामुळे राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसने महाराष्ट्राबाहेर दिल्याने काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. काँग्रेसवर नाराज होऊन आशिष यांनी महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,945चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा