30 C
Mumbai
Thursday, June 23, 2022
घरदेश दुनियातंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

Related

मंगळवार, ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ आहे. याच दिवशी एक अहवाल समोर आला आहे. तंबाखूचे सेवन करून वर्षाला जवळपास १० लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. तर जगभरात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी सुमारे ८० लाख व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू होतात.

भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. दीर्घकाळ तंबाखूच्या सेवनामुळे क्षयरोग, कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एवढंच नाही तर तंबाखूची लागवड, उत्पादन, वितरण, सेवन आणि सेवनानंतरच्या टाकाऊ पदार्थांद्वारे पर्यावरणाची सुद्धा हानी होते. सिगरेट बनवण्यासाठी दरवर्षी जगभरात सुमारे ६० कोटी झाडे तोडली जातात. या सर्व हानीमुळे तंबाखू विरोधात जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक संकल्पना सुचवली आहे. ‘पर्यावरणाचे रक्षण’ अशी ही संकल्पना आहे.

या संकल्पनेनुसार, आपण मानव जातीने एकत्रितपणे तंबाखूच्या धोक्यापासून स्वतःचे आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.

आजच्या तंबाखू दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून संदेश दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’च्या निमित्ताने निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याची शपथ घेऊया. असं ट्विट केलं आहे.

हे ही वाचा:

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

तर शरद पवारांनी तंबाखू किंवा कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे शरीरासाठी अपायकारक आहे. तंबाखू सेवनापासून दूर राहून तंबाखू व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकूया आणि निरोगी राहूया, असा संदेश दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,935चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा