28 C
Mumbai
Saturday, July 24, 2021
घरविशेष२४ तासांत मालिकेच्या वेळापत्रकात दोनदा बदल

२४ तासांत मालिकेच्या वेळापत्रकात दोनदा बदल

Related

श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भारत-श्रीलंका मालिका ४ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिली वन डे १३ जुलै ऐवजी १७ जुलैला घेण्यात येणार होती. परंतु आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

१३ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामने खेळवण्यात येणार होते. परंतु दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने पुढे ढकलण्यात आले.  सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मालिका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

पहिली वनडे १७ जुलैला घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला वन डे सामना १८ जुलैला  होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला वन डे सामना १८ जुलै, दुसरा आणि  तिसरा वन डे सामना अनुक्रमे २० आणि २३ जुलैला खेळवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

लवकरच १५% नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी?

जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर?

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

शेतकरी आंदोलकांचा पुन्हा राडा

वन डे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी २० सामने खेळवण्यात येणार होते. टी २० सामन्यांचे आयोजन २५ जुलैपासून करण्यात येणार आहे. दुसरा टी २०  सामना २७ जुलैला आणि तिसरा टी २० सामना २९ जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने आज संध्याकाळी  नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,289अनुयायीअनुकरण करा
1,970सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा