29 C
Mumbai
Thursday, July 22, 2021
घरविशेष'टीका वाली नाव'...बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र

‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र

Related

देशात सध्या लसीकरण मोहिमेने जोरदार वेग पकडला आहे. लसींचे सर्वाधिक डोस देणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश भारत ठरला आहे. अशावेळी लसीकरणाचा हा वेग थांबू नये यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. अगदी अस्मानी संकटासमोरही न झुकता लसीकरण थांबू नये यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. नुकताच याचा प्रत्यय बिहार मधील मुझफ्फरनगर येथे पाहायला मिळाला.

बिहारमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यात सध्या अस्मानी संकटाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात पूर आला असून या पूराचा फटका जिल्ह्यातील अनेक भागांना बसला आहे. जिल्ह्यातील बराचसा भाग हा पाण्याखाली गेला आहे. पण या पूर परिस्थितीचा परिणाम जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेवर होऊ नये यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी एक अनोखी शक्कल लढवत ‘टीका वाली नाव’ असा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

शेतकरी आंदोलकांचा पुन्हा राडा

लसीकरणाच्या गोंधळात अजून वाढ

जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर

या उपक्रमाच्या अंतर्गत लसीकरणासाठी एक होडी तयार करण्यात आली आहे. या होडीत बसून आरोग्य कर्मचारी हे पूरग्रस्त भागात जातात आणि नागरिकांचे लसीकरण करतात. जिल्ह्यातील पूरामुळे लसीकरण मोहिमेची गती मंदावली जाऊ नये यासाठी ही अभिनव कल्पना मुजफ्फरनगर येथील आरोग्य यंत्रणा राबवताना दिसत आहे.

आरोग्य अधिकारी आर.एस.वर्मा यांनी या उपक्रमाच्या संदर्भात माध्यमांशी बातचीत केली. “जिल्ह्यात पूर आल्यामुळे ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्या डॉक्टरांची टीम सज्ज असून बोटीवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील काही जागांची स्पेशल साईट्स म्हणून निवड करण्यात आली आहे. या भागात जाऊन बोटींमधून लसीकरण पार पडत आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,283अनुयायीअनुकरण करा
1,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा