30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषशाळा सुरू झाल्या, महाविद्यालयांचे काय?

शाळा सुरू झाल्या, महाविद्यालयांचे काय?

Google News Follow

Related

येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळांमध्ये आता घंटा वाजणार आहे. परंतु अजूनही महाविद्यालयांबाबत मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. महाविद्यालये कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. केवळ चालढकल वृत्तीच राज्यसरकारची याबाबत दिसून येत आहे. नुकतेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी माहिती दिली आहे.

सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच किती विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकतील हाही विचार करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. सध्याच्या घडीला राज्य सरकार कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा ह्यावर विचार करत आहे.

१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत, अशी माहिती यावेळी सामंत यांनी दिली. त्यामुळे अजूनही महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

हे ही वाचा:

प्रख्यात विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार कालवश

कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग

महेश मांजरेकरांचा ‘गोडसे’ चित्रपट येतोय! गांधीजयंतीलाच केली घोषणा…

पोलिसांनी अटक केलेली रुबिना विकत होती ‘म्याव म्याव’

 

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा