28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषप्रख्यात विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार कालवश

प्रख्यात विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार कालवश

Related

मराठीतील प्रख्यात विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे शनिवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षाचे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ मध्ये झाला होता.

दादासाहेब म्हणून ओळखले जाणाऱ्या प्राध्यापक द. मा. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी १४ एप्रिल १९२७ ला झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण पंढरपूरमधे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले.  त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरूवात पत्रकार म्हणून केली होती. ना.सी. फडके संपादन करत असलेल्या साप्ताहिक झंकारमध्ये ते लेखनही करत होते. पुढे त्यांनी गरवारे महाविद्यालयात १९६१मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली. त्याच महाविद्यालयातून ते निवृत्त झाले.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे.

हे ही वाचा:

कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग

महेश मांजरेकरांचा ‘गोडसे’ चित्रपट येतोय! गांधीजयंतीलाच केली घोषणा…

पोलिसांनी अटक केलेली रुबिना विकत होती ‘म्याव म्याव’

तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका

 

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा