30 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषकिश्तवाडच्या दुर्गम जंगलात दहशतवाद्यांचा शोध

किश्तवाडच्या दुर्गम जंगलात दहशतवाद्यांचा शोध

सुरक्षा दलांची मोठी मोहीम सुरू

Google News Follow

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन आणि मडवा परिसरातील दुर्गम जंगलांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. घनदाट जंगल, उंच डोंगररांगा आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी जमिनीबरोबरच हवाई पाळतही वाढवली आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात असून, प्रशिक्षित श्वानपथकांच्या मदतीने जंगलातील प्रत्येक संभाव्य ठिकाणाची तपासणी केली जात आहे.

या संयुक्त मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि ग्राम सुरक्षा रक्षक (व्हीडीजी) सहभागी झाले आहेत. मोहिमेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस आणि लष्करी अधिकारीही प्रत्यक्ष घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत. जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक किश्तवाडमध्ये तळ ठोकून संपूर्ण कारवाईचा आढावा घेत आहेत. तर डीआयजी डीकेआर आणि किश्तवाडचे पोलीस अधीक्षक अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष मैदानात मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
हे ही वाचा:
मराठवाड्याचं करायचं काय, करावा कोणता उपाय?

रत्नागिरी विमानतळ सज्ज; जानेवारीपासून विमानांचे उड्डाण!

पंतप्रधान मोदींनी आदिवासी क्रांतिकारकांना पुन्हा सन्मान प्राप्त करून दिला!

राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी दच्छन परिसरात दोन विशेष पोलीस अधिकारी अर्थात एसपीओंची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरातील जंगलांमध्ये शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. गुरुवारी या दोन्ही अधिकाऱ्यांचे गोळ्यांनी छलनी झालेले मृतदेह आढळून आले होते. विशेष म्हणजे, त्यांची सर्व्हिस शस्त्रेही गायब असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुसरीकडे, सुरक्षा यंत्रणांनी तीन वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केले असून, त्यांच्या अटकेसाठी किंवा त्यांच्याबाबत ठोस माहिती देणाऱ्यांसाठी एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दच्छन आणि मडवा परिसरातील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणे, तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांचा शोध घेणे हे सुरक्षा दलांसमोरील प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात या भागातील शोधमोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा