अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी (१२ मार्च) ‘पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची दुर्दशा’ या विषयावर काँग्रेसची एक बैठक आयोजित होती. या बैठकीला माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी हजेरी लावली आणि त्यांनी उघडपणे आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांविरुद्ध होणाऱ्या भेदभावावर प्रकाश टाकला आणि सांगितले की त्यांच्यावरही धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता.
सध्या अमेरिकेत राहणारे दानिश कनेरिया म्हणाले, पाकिस्तानमध्ये मला समान वागणूक आणि आदर मिळाला नाही आणि भेदभावामुळे माझी क्रिकेट कारकीर्द संपली. कनेरियाने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही केला.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आज आपण सर्वजण इथे जमलो होतो. आम्ही सर्वांनी आमचे अनुभव शेअर केले. आपण सर्वांनी कधी ना कधी भेदभावाचा सामना केला आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. ‘मलाही पाकिस्तानमध्ये खूप भेदभावाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे माझे क्रिकेट करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.’ मला पाकिस्तानमध्ये जो आदर मिळायला हवा होता तो मिळाला नाही.
कनेरिया यांनी खुलासा केला की, आफ्रिदीने त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले होते. आफ्रिदी आणि इतर खेळाडूंनी त्याला सामाजिकदृष्ट्या वेगळे ठेवले. याशिवाय त्यांना एकत्र जेवण्याचीही परवानगी नव्हती. इंजमाम उल हक हा एकमेव कर्णधार त्याच्या समर्थनार्थ बोलणारा असल्याचे त्याने सांगितले.
हे ही वाचा :
जाफर एक्सप्रेस हायजॅक : विरोधकांच्या टीकेवर पाकिस्तान सरकार गप्प
जम्मू- काश्मीरच्या बांदीपोरामधून शस्त्र साठ्यासह दोन संशयितांना अटक
होळीच्या रंगांची समस्या आहे त्यांनी देश सोडून जावे!
पाकिस्तानसाठी ६१ कसोटी सामने खेळणारे कनेरिया म्हणाले, ‘पाकिस्तानात होणाऱ्या भेदभावाविरुद्ध बोलणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. पाकिस्तानमध्ये लोक कसे त्रास सहन करतात हे जगाला, विशेषतः अमेरिकेला सांगणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा दुसरा हिंदू आहे. त्यांचे काका अनिल दलपत हे देखील पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटपटू राहिले आहेत. ६१ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, दानिश कनेरियाने १८ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत.