बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या येत्या सीझनचे होस्ट म्हणून पुनरागमन करणार आहेत. बिग बींनी स्वतः याची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘केबीसी’ मधून अमिताभ बच्चन बाहेर पडणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
१२ मार्च रोजी शोच्या निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी चाहत्यांना पुढील सीझनमध्ये भेटण्याचे आश्वासन दिले. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हिंदीतून आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. प्रत्येक नव्या पर्वाच्या सुरुवातीला मनात एक विचार येतो, की इतक्या वर्षांनंतरही तुमचे प्रेम, साथ, आणि आपुलकी तशीच आहे का? आणि प्रत्येक पर्वाच्या शेवटी हेच सत्य ठरते की या खेळाने, या मंचाने, आणि तुम्ही मला जितके दिले आहे, ते मी कधीच अपेक्षा केली नव्हती.
हेही वाचा..
‘शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यास सांगत असे, भेदभावामुळेच कारकीर्द संपली!
जाफर एक्सप्रेस हायजॅक : विरोधकांच्या टीकेवर पाकिस्तान सरकार गप्प
जम्मू- काश्मीरच्या बांदीपोरामधून शस्त्र साठ्यासह दोन संशयितांना अटक
आम्हाला आशा आहे की हे नाते असेच कायम राहील आणि कधीही तुटणार नाही.” बच्चन पुढे म्हणतात, जाता जाता, मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की जर आमच्या प्रयत्नांनी कुणाच्या तरी जीवनाला किंचितसा सकारात्मक स्पर्श केला असेल, जर या मंचावरून बोललेल्या शब्दांनी कोणाच्या मनात आशा निर्माण केली असेल, तर आम्ही आमच्या २५ वर्षांच्या या साधनेला यशस्वी समजू.