26 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरविशेषशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी...

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती

Related

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ शनिवार, १० सप्टेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे त्या काळात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे प्रभारी कुलगुरू म्हणून मुंबई विद्यापीठाचे काम पाहणार आहेत.

डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील वडगाव येथील आहेत. शिर्के यांनी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथून १९८५ मध्ये पदवी आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून १९८७ साली सांख्यिकी विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते १९८७ मध्ये सांख्यिकी विभागात CSIR संशोधन सहकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी २००५ ते २०१५ पर्यंत सांख्यिकी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.

हे ही वाचा:

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

वणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सुमारे ३० वर्षांचा अध्यापन आणि ३३ वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे. साधारण ७५ हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशने त्यांच्या नावे आहेत. एक उत्कृष्ट संशोधक म्हणून त्यांनी भारतामध्ये आणि भारताबाहेर अनेक परिषदा, अभ्यासक्रमांमध्ये भाषणे दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पूर्ण केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा