28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषवणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?

वणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?

Google News Follow

Related

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मातेची संवर्धन प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातून मातेचे एक वेगळे रूप समोर आले आहे.

मातेच्या मूर्तीवरील शेंदूर दूर केल्यानंतर एक वेगळे रूप पाहायला मिळते आहे. भगवती मातेच्या मूर्तीवरील ११०० किलो शेंदूर काढण्यात आला आहे. गेले ४५ दिवस ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे एका वेगळ्या रूपातील देवी आता पाहायला मिळते आहे. त्याबद्दल भक्तांमध्येही चर्चा सुरू आहे.

२२ जुलैपासून ५ सप्टेंबरपर्यंत मातेचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात हे संवर्धन करण्यात आले. त्यामुळे भक्तांना देवीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे भक्तांसाठी पहिल्या पायरीवर देवीच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती. मात्र भक्तांना देण्यात येणारा प्रसाद, इतर सोयीसुविधा यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. गेले अडीच वर्षे हे मंदिर कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले होते. अर्थात, काही निर्बंधांसह भाविकांसाठी मंदिर खुले होते.

हे ही वाचा:

याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

मशिदीतून केला गेला महाविरी आखाड्याच्या मिरवणुकीवर दगडांचा मारा

याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?

 

नाशिकपासून ६५ किमी अंतरावर वणी असून तेथील सप्तशृंगी गडावर ही देवी वसलेली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखले जाते. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकादेवी ही पूर्णपिठे महाराष्ट्रात आहेत. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे एक रूप म्हणून सप्तशृंगी मातेला महत्त्व आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या सात उंच शिखरांमुळे याला सप्तशृंगी गड म्हणतात. शुंभनिशुंभ आणि महिषासूर या राक्षसांच नाश सप्तशृंगी देवीने केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा