26 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषसिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

काँग्रेस देणार तिकीट

Google News Follow

Related

पंजाबमधील दोन दहशतवादी टोळ्यांमध्ये आपला जीव गमावलेले लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे वडील राजकारणात प्रवेश करणार आहेत.ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे.राजकारणात उतरणार नसल्याचे यापूर्वी अनेकदा सांगणाऱ्या बलकौर सिंग यांना आता काँग्रेसने निवडणूक लढविण्यासाठी तयार केले आहे.काँग्रेस त्यांना भटिंडा मतदार संघातून उमेदवारी देऊ शकते.दोन महिन्यांपूर्वी सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले होते.आम्ही राजकारण का करू नये, असे ते म्हणाले होते.माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यांच्या नातवाने खासदार झाल्यानंतर मारेकऱ्याला शिक्षा दिली.

रवनीत सिंह बिट्टूचे उदाहरण देताना बलकौर सिंग म्हणाले होते की, जर त्यांनी न्यायासाठी असे केले असेल तर त्यात गैर असे काहीच नाही.रवनीत सिंह बिट्टू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू असून ते लुधियानाचे खासदार आहेत.आता त्यांनी भाजपात प्रवेश केला असून भाजपच्या तिकिटावर ते निवडणुकीत उतरले आहेत.दरम्यान, बलकौर सिंग यांना काँग्रेसने लोकसभेसाठी ऑफर दिली होती, मात्र तेव्हा त्यांनी राजकारणात येणार नसल्याचे सांगितले होते.याबाबत मुसेवालाच्या चाहत्यांशी चर्चा करणार असल्याचे तेव्हा ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

३६ टक्के आयआयटी मुंबईचे पदवीधर नोकऱ्या मिळवण्यात अपयशी!

मोदी सरकारच्या यशस्वी बचाव मोहिमा; मोदी ठरले संकटमोचक!

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडींग यांनी याआधीच म्हटले की, जर बलकौर सिंग यांना निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेस त्यांना तिकीट देण्यास तयार आहे.सिद्धू मुसेवाला यांनी २०२२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, जर काँग्रेसने बलकौर सिंग यांना भटिंडा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास येथील लढत रोचक होईल.भटिंडा हा मतदारसंघ अकाली दलाचा बालेकिल्ला असून हरसिमरत कौर बादल येथील खासदार आहेत.यावेळी सुद्धा अकाली दलाकडून त्यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.तसेच अकाली दलाचे नेते सिकंदर सिंह मलुका यांची सून आयएएस परमपाल कौर सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत.जर त्यांनी भाजपात प्रवेश केला तर त्यांना भाजपकडून तिकीट मिळू शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा