22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषआयएएस पदाचा परमपाल कौर सिद्धू यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!

आयएएस पदाचा परमपाल कौर सिद्धू यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!

अकाली दल नेते मलुका यांच्या आहेत सून

Google News Follow

Related

पंजाबमधील अकाली दलाचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अकाली दलाला आता आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. शिरोमणी अकाली दलाचे नेते सिकंदर सिंह मलुका यांची सून आयएएस परमपाल कौर सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. परमपाल कौर सिद्धू या भटिंडा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. सिद्धू हे सध्या पंजाब स्टेट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक होते.

कोण आहेत परमपाल कौर?
परमपाल कौर २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार असून त्या आधीच रजेवर आहेत. अकाली दलाचे नेते सिकंदर सिंह मलुका यांच्या मुलाशी त्यांचे लग्न झाले.परमपाल कौर सध्या पंजाब स्टेट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.त्यांची या पदावर नुकतीच नियुक्ती झाली होती.

हे ही वाचा:

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

३६ टक्के आयआयटी मुंबईचे पदवीधर नोकऱ्या मिळवण्यात अपयशी!

मोदी सरकारच्या यशस्वी बचाव मोहिमा; मोदी ठरले संकटमोचक!

एलॉन मस्कच्या टेस्लाचा तीन अब्ज डॉलर प्रकल्पाच्या जागेसाठी शोध!

दरम्यान, सरकारी सूत्रांनी सांगितले की, सध्या पंजाब राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असलेल्या परमपाल कौर सिद्धू यांनी आपला राजीनामा मुख्य सचिव अनुराग वर्मा यांच्याकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा स्वीकारल्यास तो केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठवला जाईल.दरम्यान, पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा