25 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरविशेषशाळेची बॅग हरवल्याची तक्रार लहानगीने पोलिसांकडे केली आणि चक्क बॅग सापडली!

शाळेची बॅग हरवल्याची तक्रार लहानगीने पोलिसांकडे केली आणि चक्क बॅग सापडली!

अभ्यास आणि आपल्या शाळेच्या साहित्यावर असलेल्या लहानगीच्या प्रेमाचे कौतुक

Google News Follow

Related

शुजालपूर मंडी परिसरातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीच्या निरागसतेने, अभ्यासावरील निष्ठेने आणि जिद्दीने पोलीसही भावूक झाले आणि तिची हरवलेली शाळेची बॅग शोधून काढण्यासाठी विशेष पथक तयार करून ती यशस्वीपणे परत मिळवून दिली. त्याची कहाणी मोठी रोचक आहे.

ही विद्यार्थिनी चेरी नायक असून ती सरस्वती शिशु मंदिर या शाळेत शिक्षण घेत आहे. गुरुवारी ती आपल्या आई पूजा नायक, आजी कृष्णा आणि मावशी रंजना यांच्यासोबत शाळेत गेली होती. शाळेतून परतताना ऑटो-रिक्षामधून घरी येताना तिची शाळेची बॅग चुकून त्या ऑटोमध्येच राहून गेली. बॅग हरवल्याचे कळताच ती ढसाढसा रडू लागली.

घरी पोहोचल्यावर बॅग सापडत नसल्याचे लक्षात येताच चेरी फारच अस्वस्थ झाली. त्या बॅगमध्ये तिची सर्व पुस्तके, वह्या आणि शालेय अभ्यासाचे साहित्य होते. अभ्यास कसा करायचा, शाळेत काय नेणार, या विचारांनी ती रडू लागली. कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅग व पुस्तके घेऊन देऊ असे सांगितले. मात्र चेरीने ते मान्य केले नाही. तिच्या मते तिचीच बॅग मिळवणे महत्त्वाचे होते. तिने हट्ट धरून पोलिसांकडे मदत मागण्याचा आग्रह धरला.

चिमुकलीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मुलीचा हट्ट पाहून तिचे वडील संदीप नायक आणि आजोबा अशोक नायक तिला शुजालपूर मंडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे चेरीने स्वतःच एसडीओपी निमिष देशमुख यांना आपली अडचण सांगितली. मुलीचे अश्रू, तिचा अभ्यासाबद्दलचा ओढा पाहून एसडीओपी देशमुख तात्काळ हलले आणि बॅग शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.

ट्रॅफिक पोलिसांची मदत, शहरभर सीसीटीव्ही तपासले

एसडीओपी देशमुख यांनी ट्रॅफिक पोलिसांची मदत घेण्याचे आदेश दिले. ट्रॅफिक एएसआय धर्मेंद्र परस्ते आणि हेड कॉन्स्टेबल सुनील गुर्जर यांच्यावर शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेरी आई आणि आजीसोबत ऑटोमध्ये बसलेली दिसली. मात्र त्या ऑटोला नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे शोध अधिक कठीण झाला.

नंबर प्लेट नसलेल्या ऑटोचा शोध सुरू

अडचण असूनही पोलिसांनी हार मानली नाही. फुटेजमध्ये ऑटोच्या पुढील बाजूला लिहिलेले नाव आणि वर लावलेला लोखंडी स्टँड लक्षात घेऊन शोध सुरू करण्यात आला. या खुणांच्या आधारे परिसरातील ऑटो स्टँडवर चौकशी करण्यात आली. चौकशीत संबंधित ऑटोचालकाचे नाव परवेझ असल्याचे समोर आले. इतर ऑटोचालकांकडून त्याचा मोबाईल नंबर मिळवण्यात आला.

हे ही वाचा:

एसआयपी इनफ्लो विक्रमी ३ लाख कोटी रुपयांपुढे

इस्लामी जमावाची संगीत कार्यक्रमावर दगडफेक; २० जण जखमी

५० लाखांचे कर्ज घेऊन बीएलओ गायब

झेप्टोला २०२५ मध्ये १७७ टक्के तोटा

रिक्षा चालकाचे सहकार्य, बॅग सुरक्षित ठेवलेली

पोलिसांनी परवेझला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. परवेझने सांगितले की ऑटोमध्ये त्याला शाळेची बॅग सापडली होती. मात्र प्रवासी ओळखता न आल्याने त्याने ती बॅग घरी सुरक्षित ठेवली होती. वेळ झाल्याने पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी बॅग घेऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

बॅग मिळताच चेरीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू

शुक्रवारी सकाळी परवेझ शाळेची बॅग घेऊन पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी चेरीचे वडील संदीप नायक यांना बोलावले आणि चेरीलाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बॅग हातात मिळताच चेरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. तिने पोलिसांना प्रेमाने धन्यवाद दिले. हरवलेली बॅग परत मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले.

पोलिसांनी कौतुक केले

या घटनेबाबत एसडीओपी निमिष देशमुख म्हणाले, “मुलीची अभ्यासावरील निष्ठा पाहून आम्ही बॅग शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने बॅग मिळवण्यात यश आले. आम्ही ती बॅग पुन्हा तिच्या खांद्यावर टाकली आणि तिला शुभेच्छांसह निरोप दिला. कुटुंबाच्या विनंतीनुसार ऑटोचालक परवेझ याला समज देऊन सोडण्यात आले असून, भविष्यात काही सापडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

समाजासाठी प्रेरणादायी घटना

ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, पोलिसांच्या संवेदनशीलतेचे आणि चिमुकलीच्या शिक्षणावरील प्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चेरी नायकची जिद्द आणि शुजालपूर पोलिसांची माणुसकी समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा