28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषस्पुतनिक वी लस पुण्यात दाखल

स्पुतनिक वी लस पुण्यात दाखल

Google News Follow

Related

भारत सरकारनं आपापर्यंत तीन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरमची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीला मंजुरी देण्यात आली आहे. स्पुतनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत आहे. स्पुतनिक वी लस आता पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. स्पुतनिक वी लसीचा एक डोस ११४२ रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

पुणे शहरातील रुग्णालयांना स्पुतनिक वी लसीचे ६०० डोस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील स्पुतनिक लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका ३६ वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस दिली गेली, असं डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितलं.

डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी स्पुतनिक वी लसीची पहिली खेप प्राप्त झाली तेव्हा पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्याला दिली गेली होती. पुणेकरांना स्पुतनिक वी लस २८ जूनपासून उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र, लस घेण्यासाठी कोविन ऍप्प आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.

रशियानं तयार केलेल्या स्पुतनिक लसीचे दोन डोस घेण्यामधील अंतर हे २१ दिवसांचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यावा लागतो. स्पुतनिक वी लसीच्या एका डोसची किमंत ११४२ रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण…

मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात

दक्षिण मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

स्पुतनिक व्ही लस किती प्रभावी आहे, त्यावरही एक नजर टाकुयात. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटमध्ये या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पुतनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल ९२ टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आलीय. या लसीचे ट्रायल होण्याआधीच रशियात या लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ही लस वादातही सापडली होती. मात्र, आता ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला एकूण ५५ देशांमध्ये मान्यता देण्यात आलीय. स्पुतनिक लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २१ दिवसांनीच दुसरा डोस दिला जातो. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळं भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते. देशात लसीचा तुटवडा आहे. त्यात स्पुतनिक लस आल्यानं देशभरातल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच हातभार लागणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा