26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरविशेषएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच ते ५ हजारांची वाढ

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच ते ५ हजारांची वाढ

Related

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठेवला प्रस्ताव

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघावा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. त्यात पगारात अडीच हजार ते ५ हजार इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, अशी घोषणा परब यांनी पत्रकार परिषदेत केली. एकूण ४१ टक्के पगार वाढ असेल असे शासनाचे म्हणणे आहे. आता यासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील आणि हा प्रस्ताव त्यांना मान्य आहे का, की विलिनीकरणावरच ठाम राहायचे आहे, याविषयी चर्चा करणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांना जो भत्ता दिला जातो तो राज्य सरकारच्या डीए प्रमाणे असतो. घरभाडे भत्ता राज्य सरकारला दिला जातो तो एसटी कर्मचाऱ्यांना असतो. पगारवाढ राज्य सरकारप्रमाणे असावी, असे म्हटले होते ते दिवाळीनंतर होईल असे आम्ही मान्य केले होते. मुद्दा होता तो बेसिकचा होता. आज निर्णय घेतला आहे की, जे कर्मचारी एक वर्ष ते १० वर्ष या कॅटेगरीत आहेत या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ठोक ५ हजार वाढ होईल. त्यामुळे १ ते १० वर्षे काम करत आहेत त्यांचे मूळ वेतन १२ हजार ८० होतं आता ते १७ हजार ३९५ झाले आहे. आता पूर्ण वेतन १७ हजार ८० होते ते आता २४ हजार ५९४ झाले आहे. या गटात कमी पगार आहेत त्यांचा आक्रोश होता म्हणून ही वाढ करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची एसटीतली सर्वात मोठी वाढ आहे.

१० ते २० वर्षांची कारकीर्द आहेत यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे, असेही परब म्हणाले. त्यामुळे ज्यांचा मूळ पगार १६ हजार रु. होता तो २३ हजार ४० झाला आहे. वाढ होऊन तो २८ हजार ८०० झाला आहे. २० व त्यापेक्षा अधिक वर्षांची सेवा झालेल्यांच्या पगारात २५०० ने वाढ केली आहे, असेही परब यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संप मिटवून सकाळी ८ वाजता हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

 

हे ही वाचा:

परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती

नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

गुजरातमधील गुटखा वितरक आयकर विभागाच्या रडारवर

 

परब यांनी सांगितले की, दुसरी गोष्ट मनात होती कामगारांच्या कोरोनामुळे आर्थिक नुकसानीत होती एसटी राज्य शासनाने २७०० कोटींची मदत केली होती. आता राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आधी होईल ही हमी घेतली आहे. १० नंतर आता पगार होणार नाही.

या बाबतीत या चर्चा झाल्या त्या कामगारांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रोत्साहकाची योजना जाहीर करतो आहोत. एसटीचं उत्पन्न वाढलं तर त्या चालक वाहकांना प्रोत्साहन मिळेल. ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. जे कामगार कामावर येतात पण ड्युटी नसल्याने त्यांची रजा भरली जाते त्यांचा तो पगार मिळत नाही. यापुढे जो कामगार हजेरी लावेल त्याला पगार मिळेल.

विलीनीकरण हवे अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्यानुसार ही समिती जो घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू अशी शासनाची भूमिका आहे. ही भूमिका न्यायालयानुसार असल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. त्यामुळे ग्रामीण जनतेची. विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली. न्यायालयाच्या समितीचा अहवाल यायला अजून वेळ आहे. अशावेळेला नेमके काय करायचे याबाबत सतत विचार करत होतो. म्हणून सरकारतर्फे आम्ही पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला.

एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेल्या प्रस्तावातील मुद्दे-

  • पगारात अडीच ते ५ हजार रु. इतकी वाढ
  • १ ते १० वर्षांतील कॅटेगरीसाठी ५ हजार वाढ
  • १० ते २० वर्षांतील कॅटेगरीसाठी ४ हजार रु. वाढ
  • २० पेक्षा अधिक वर्षांतील कॅटेगरीसाठी २५०० रु. वाढ
  • पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आतच होईल.
  • अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालकांना, वाहकांना प्रोत्साहके
  • आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार
  • संप मिटवून नोकरीवर हजर राहण्याचे आवाहन
  • जे कर्मचारी हजर राहतील त्यांचे निलंबन तातडीने रद्द होईल.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा