28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणविलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

Google News Follow

Related

एसटी कर्मचारी जवळपास १५ दिवस संपावर असले तरी आता त्यावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत मात्र हा तोडगा विलिनीकरणाचा असेल की पगारवाढीचा याविषयी आता चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र एसटी कर्मचारी आणि त्यांच्या संपाचे नेतृत्व करणारे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विलिनीकरणावर ठाम आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले असून त्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते, हे स्पष्ट होईल. पण सध्या पगारवाढीचा मार्ग समोर असल्याचे बोलले जात आहे. त्यात किती पगारवाढ होईल, पगार प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला दिला जाईल, अशी माहिती बाहेर येऊ लागली आहे. पण गोपीचंद पडळकर यांनी विलिनीकरण व्हायलाच हवे, असे म्हटले आहे.

मंगळवारीही अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली आणि त्यावेळी पगारवाढीचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार पुन्हा बुधवारी ११ वाजता बैठक झाली आणि त्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर परब हे अजित पवार यांना भेटण्यासाठी रवाना झाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला मूर्त रूप येईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देता येईल का, असा प्रस्ताव शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांपुढे ठेवण्यात आला आहे.

 

हे ही वाचा:

कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

नवी मुंबईतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मागत होता खंडणी, गुन्हा दाखल

आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

 

सध्या महाराष्ट्रातील सगळ्या एसटी डेपोत बंद आहे. एसटी कर्मचारी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना मिळणारे वेतनही तुटपुंजे आहे. या सगळ्या प्रश्नांवर ताबडतोब तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा