28 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषछत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!

छत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!

प्रार्थना सभेच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याचा संघटनेचा आरोप 

Google News Follow

Related

छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यातील अमलेश्वर पोलीस स्टेशन परिसरात धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील अयोध्या नगर कॉलनीतील एका घरात ख्रिश्चन प्रार्थना सभा आयोजित केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच बजरंग दल आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत घरासमोर गोंधळ घातला. ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याचा आरोप हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी हनुमान चालीसा पठण सुरू केले आणि धर्मांतराच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि आंदोलकांनी घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली.

यावेळी एका स्थानिक महिलेने सांगितले की, या घरातून अनेक दिवसांपासून लोकांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो. घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी खुलेआम सांगितले कि आम्ही धर्मांतर करत करतो, तुम्हाला काय करायचे ते करा.

हे ही वाचा : 

पाकिस्तानकडून अफगाणीस्तानमध्ये हवाई हल्ले

काँग्रेसचे चीन प्रेम पुन्हा दिसले

२०३६ ऑलिंपिकचे यजमान पद मिळाल्यास सर्वात हरित ऑलिंपिक भारतात होईल

संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!

घटनेची माहिती मिळताच अमलेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या समजूतदारपणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते शांत झाले. यानंतर, पोलिसांनी घरात उपस्थित असलेल्या पुरुषांना एक-एक करून बाहेर काढले.

या संपूर्ण प्रकरणावर अतिरिक्त एसपी अभिषेक झा म्हणाले की, पोलिसांना एका घरात धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथक तिथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादरी सहित घरात उपस्थित असलेल्या इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बैठकीला पोहोचलेल्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा