भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. नऊ महिन्यांपासून अडकून पडलेल्या या दोन अंतराळवीरांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी क्रू-10 हे यान लाँच होणार होते. मात्र, पुन्हा एकदा ही मोहिम थांबवण्यात आली आहे. याआधी नासाने १३ मार्चपर्यंत सुनीता विल्यम्स यांना परत आणणार असं जाहीर केलं होतं.
उद्योजक एलोन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चार अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली होती. हे पथक पाठवल्यानंतरच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतात. हे क्रू-10 बुधवार, १२ मार्च रोजी रवाना होणार होते, परंतु रॉकेटच्या लाँचपॅडमध्ये शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्येमुळे स्पेसएक्सने क्रू-10 चे प्रक्षेपण रद्द केले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी या चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले जाणार होते, त्यानंतरच ते परत येणार होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गेल्या ९ महिन्यांपासून अवकाशात अडकले आहे. या मोहिमेवर ते आठ दिवसांसाठी गेले होते पण बोईंगच्या स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते दोघेही अंतराळात अडकून पडले आहेत.
हे ही वाचा :
रशियाने लष्करी आक्रमण सुरू ठेवल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल
जाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा
‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’
शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !
क्रू-10 च्या अयशस्वी प्रक्षेपणादरम्यान अधिकाऱ्यांनी मोहीम रद्द करण्याची घोषणा केली. यासोबतच, हे मिशन पुढील कोणत्या तारखेला सुरू केले जाईल हे अद्याप जाहीर केलेले नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ स्थानकावरून परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चार अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना होती. त्यांना पाठवण्यासाठी, फ्लोरिडा येथून स्पेसएक्स रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना होती, परंतु आता हे प्रक्षेपण सध्यासाठी रद्द करण्यात आले आहे. केप कॅनावेरलमधील केनेडी स्पेस सेंटर येथून सकाळी ७.४८ वाजता स्पेसएक्स रॉकेट प्रक्षेपित होणार होते, ज्यामध्ये क्रू-10 ला घेऊन जाणार होते, चार सदस्यांचा हा क्रू होता. दोन अमेरिकन अंतराळवीर, एक जपानचा आणि एक रशियाचा.