26 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषयुट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!

'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये सहभागी होण्यावर बंदी

Google News Follow

Related

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या एका अश्लील विनोदा प्रकरणी युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला मोठ्या अडचणीत आला आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. हे एफआयआर रद्द करण्यासाठी युट्यूबरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी (१८ फेब्रुवारी) न्यायालयात सुनावणी पार पडली.

सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहबादियाला अटक होण्यापासून दिलास दिला. परंतु, त्याच्या अश्लील विनोदावरून त्याला फटकारले. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत रणवीर आणि त्याच्या सहकलाकारांना इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये सहभागी होता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले, यांचे मन घाणेरडे आहे. अशा व्यक्तीचा खटला न्यायालयाने का ऐकावा?. लोकप्रिय असण्याचा असा अर्थ नाही की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकता.

हे ही वाचा  :

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सात मुस्लीम तरुण ताब्यात!

कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!

गाझियाबादमधील मदरशावर बुलडोझर, २ लाखांचा दंडही ठोठावला!

मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरून देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मागणार

रणवीर अलाहबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले की, रणवीरला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची जीभ कापणाऱ्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रणवीरच्या वकिलालाही झापले आणि म्हटले, त्यांनी वापरलेल्या भाषेचा तुम्ही बचाव करत आहात ?.

यावर स्पष्टीकरण देताना वकील म्हणाले, अजिबात नाही. मला वैयक्तिकरित्या अशा गोष्टी आवडत नाहीत. वकील पुढे म्हणाले, या शब्दांमुळे तोही वैयक्तिकरित्या दुखावला आहे. एकाच टिप्पणीसाठी वेगवेगळे एफआयआर दाखल करणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. सध्या रणवीरविरुद्ध दोन एफआयआर दाखल असून तिसरा एफआयआर देखील नोंदवला जात असल्याचेही वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने यावर म्हटले, धमक्या देणाऱ्यांवर संबंधित राज्य सरकार कारवाई करेल. पोलीस जेव्हा चौकशीसाठी बोलावतील तेव्हा आवश्यक तेवढी सुरक्षा पुरवतील, याची आम्हाला खात्री आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रणवीरला अटकेपासून सशर्त दिलासा दिला. रणवीरच्या याचिकेवर नोटीस बजावत न्यायालयाने म्हटले की, रणवीरला चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्याला हजर रहावे लागेल. परदेशात जाऊ नये यासाठी त्याचा पासपोर्ट जप्त केला जाईल, पोलीस स्टेशनमध्ये तो जमा करावा लागेल. न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत रणवीर आणि त्याच्या सहकलाकारांना इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये सहभागी होता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा