27 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरविशेषहमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

इस्रायलचे माजी सल्लागार शुफ्तान यांनी केली मीमांसा

Google News Follow

Related

श्रीकांत पटवर्धन

“इस्राएल – पालेस्तेईन प्रमाणेच भारत पाकिस्तान प्रश्न” – २९ ऑक्टोबर च्या लेखाचे पुनःस्मरण वाचकांना आमच्या  २९ ऑक्टोबर २०२३ च्या लेखाची आठवण करून देण्याची वेळ इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते. त्या लेखात आम्ही इस्राएल – हमास / पालेस्तेईन संघर्षाची तुलना भारत – पाकिस्तान प्रश्नाशी केली होती. आणि अर्थात, इस्राएल ज्या पद्धतीने त्यांच्या शत्रूंशी प्रखर झुंज देत आहे, देत आला आहे, अगदी तशाच रीतीने आपण आपल्या शत्रूशी लढा द्यायला हवा, असे मत मांडले आहे.

गेल्या ७६ वर्षात, देशाच्या राजकारणावर असलेला गांधी –नेहरू वादाचा प्रभाव, छद्म निधर्मिता, उदारमतवाद, आणि तथाकथित पुरोगामित्व इत्यादींमुळे अशा भूमिकेवर वृत्तपत्रे, समाज माध्यमे यांतून नेहमीच टीका होते. “तुम्हाला काय कळते ?….. युध्द इतके सोपे नसते, बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो, …..आंतरराष्ट्रीय दबाव असतात ,……” एक ना दोन….. – अशा असंख्य आक्षेपांना तोंड द्यावे लागते.

२९ ऑक्टोबरच्या आमच्या लेखावरही अशा तऱ्हेची टीका झाली असणार, होत असणार, याची पूर्ण कल्पना आहे. पण मग आज पुन्हा त्या लेखाची आठवण कशासाठी ? तेच सांगायचे आहे. आजच्या टाईम्स ऑफ इंडिया मध्ये दान शुफ्तान (Dan Schueftan), इस्राएलच्या दोन माजी पंतप्रधानाचे – यित्झाक राबिन आणि अरिएल शारोन , यांचे सल्लागार, यांची मुलाखत टाईम्स च्या रुद्रनील घोष यांनी घेतलेली प्रकाशित झाली आहे. त्याचे शीर्षकच – “Gaza is like Pakistan. There can be no solution, only a response.” असे आहे. (!)

अगदी थोडक्यात सांगायचे, तर दान शुफ्तान यांनी हे दाखवून दिलेय, की हमास आणि तत्सम संघटनांचे जिहादी तत्त्वज्ञान ही एक वृत्ती आहे; ती पूर्णपणे संपवता किंवा नष्ट करता येणार नाही, पण तिचा सतत कडवा प्रतिकार करावा लागेल, तिच्याशी सतत लढावे लागेल. आश्चर्य म्हणजे, दान शुफ्तान यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना चक्क भारत आणि पाकिस्तान यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे !

“गाझा मध्ये हमास ला पूर्ण निष्प्रभ केल्यानंतर तिथे जी एकप्रकारची पोकळी निर्माण होईल, त्याचे काय करणार ? कारण पालेस्तेईन ऑथोरिटी तर तिथे हमासची जागा घेणे शक्य नाही, ?” या प्रश्नाला उत्तर देताना दान शुफ्तान म्हणतात :
“Has India solved the problem of Pakistan? I do not think so. Therefore some problems
don’t have a solution, they have a response. (“भारताने पाकिस्तानचा प्रश्न सोडवला आहे का ? मला नाही तसे वाटत. कारण, काही प्रश्नांना उत्तरे नसतात. पण त्यांना प्रतिसाद द्यायचा असतो, त्यांचा प्रतिकार सतत करावा लागतो.”) गाझा मधील इस्राएलचे बॉम्ब हल्ले मदत कार्य, वगैरेसाठी अजिबात उसंत न देता तसेच चालू ठेवण्याचे त्यांनी भक्कम समर्थन केले आहे. हमास ची भूमिगत बोगद्यांतील लपण्याची आश्रयस्थाने पूर्णतः नष्ट करणे, हे उद्दिष्ट. ते पूर्ण झाल्याखेरीज जराही सूट दिल्यास शत्रूला पुन्हा जुळवाजुळव करण्यास उसंत मिळेल, तसेच इराण, सिरिया यांच्या मदतीने हिजबोला सारख्या संघटना हमासच्या सहाय्यासाठी उतरू शकतील, याची पूर्ण जाणीव इस्राएलला आहे. त्यामुळे तात्पुरता युद्धविराम शक्य नाही.

हे ही वाचा:

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

 

गेल्या ७६ वर्षांत पाकिस्तानने आमच्या देशाशी सतत शत्रुत्वच केले आहे. अलीकडे हमास ने इस्राएल वर जो हल्ला केला, त्या प्रकारचे असंख्य हल्ले पाकिस्तानने आमच्यावर केले आहेत. आमच्या २९ ऑक्टोबरच्या लेखात तो तपशील सविस्तर असल्यामुळे पुनरुक्तीची गरज नाही. इथे दान शुफ्तान यांनी जे विचार मांडलेत, त्या अनुषंगाने फक्त एव्हढेच म्हणता येईल, की पाकिस्तानला आमचा प्रतिसाद कसा असायला हवा होता, किंवा अजूनही कसा ठेवता येईल, ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण / आदर्श (Role model) इस्राएल – हमास संघर्षाच्या रूपाने आमच्यासमोर आहे.

क्षणभर आपण बाकीचे सर्व सोडून देऊ. केवळ दोन मुद्दे विचारात घेऊ. पहिला मुद्दा आपल्या देशाचा ५२००० चौरस कि.मी. भूभाग पाकिस्तानने १९४८ पासून जबरीने बळकावून आपल्या ताब्यात ठेवलेला आहे.(PoK) आणि दुसरे म्हणजे देशातील असंख्य दहशतवादी अतिरेकी हल्ल्यांचे, बॉम्बस्फोटांचे सूत्रधार, फरार गुन्हेगार पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. केवळ ह्या दोन मुद्द्यांसाठी आपण पाकिस्तानचा प्रतिकार इस्राएल च्या धोरणानुसार – त्यांचा आदर्श ठेवून – करायला हवा. पाकिस्तानला तसाच प्रतिकार हवा. उद्दिष्ट साध्य होईपर्यंत न थांबणारा, प्रखर. दान शुफ्तान यांच्या टाईम्स ऑफ इंडिया मधील प्रगट मुलाखतीतून एव्हढा बोध आपण घ्यायला हरकत नाही.

We could certainly borrow a few leaves from the book of Israel.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा