भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्वच राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या ७ मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आले आहेत. तणाव वाढलेला असतानाही पाकिस्तानकडून सीमाभागात कुरापती सुरूचं असून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
गृहमंत्रालयाकडून ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यावेळी हवाई हल्ला होतो, त्याची सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. या सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
या सरावांदरम्यान, हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सुरू केले जातील आणि शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाईल. संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता आपत्कालीन काळात ‘ब्लॅकआऊट’ करण्याचा उपाय असो अथवा प्रमुख प्रकल्प, प्रतिष्ठित संस्थांसह इतर केंद्रांच्या संरक्षणाच्या उपायांचाही या सरावात समावेश असेल. वित्तीय शिस्तीसाठी असलेल्या योजनांच्या आधुनिकीकरणासह त्याचा सराव करण्याचे निर्देशही केंद्राने अशा राज्यांना दिले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये किमान २४४ नागरी जिल्हे सहभागी होत आहेत.
हे ही वाचा :
भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय
‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या…
एअरगनने दोन डझनहून अधिक माकडांची हत्या!
महाकुंभमधील रुपवती हर्षा रिछारियाने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या अस्लमला दिली तंबी
केंद्राने मंगळवारी केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये देशव्यापी मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), रेल्वे बोर्ड आणि हवाई संरक्षण विभागाचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी होतील.







