28 C
Mumbai
Friday, March 24, 2023
घरविशेषकाश्मिरी हिंदू संजय शर्माला मारणाऱ्या दहशतवाद्याला घातले कंठस्नान

काश्मिरी हिंदू संजय शर्माला मारणाऱ्या दहशतवाद्याला घातले कंठस्नान

२६ फेब्रुवारीला पुलवामा येथे या दहशतवाद्यांनी काश्मीरी हिंदू विद्यार्थी संजय शर्माला त्याच्या घरापासून १०० मीटर अंतरावर गोळ्या घालून ठार केले होते.

Google News Follow

Related

पुलवामा येथे काश्मिरी हिंदू संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे संयुक्त सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये प्रचंड चकमक झाली. मंगळवारी सकाळी झालेल्या या चकमकीत या दहशवाद्याला मारण्यात आले.

दहशतवाद्यांशी दीर्घकाळ चाललेल्या चकमकीनंतर आकीब मुश्ताक नावाचा दहशतवादी मारला गेला. हा दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीनचा सदस्य होता. २६ फेब्रुवारीला पुलवामा येथे या दहशतवाद्यांनी काश्मीरी हिंदू विद्यार्थी संजय शर्माला त्याच्या घरापासून १०० मीटर अंतरावर गोळ्या घालून ठार केले होते. त्याला तात्काळ रुग्णालया नेण्यात आले पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

हे ही वाचा:

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

६० वर्षांनंतर ‘नोकिया’ने रंगरूप बदलले…

वकील प्रवीण चव्हाण गजाआड …कालिया, सांबा अडकले,गब्बर सिंगला अटक कधी?

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ म्हणून मोदींना भेटणार

गेल्या काही काळात येथे काश्मिरी पंडितांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून मारण्यात येत आहे. त्याद्वारे परिसरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे.  गेल्या वर्षी भुसवर्गमध्ये २९ दहशतवादी हल्ले झाले. त्यात तीन काश्मिरी पंडित, राजस्थानातील एक बँक व्यवस्थापक व ८ परदेशी नागरिकांसह एकूण १८ लोकांना मारण्यात आले.

काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यापासून काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना पुन्हा एकदा तिथे दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच त्यांनी काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची वेदनादायक कहाणी समोर आणली होती. त्यानंतर काश्मिरी पंडितांचा विषय बराच चर्चिला गेला. त्यातूनच काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा डाव दहशतवादी संघटना व त्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानमार्फत आखला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा