26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरक्राईमनामादेशावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या सर्फराजची गठडी वळली

देशावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या सर्फराजची गठडी वळली

इंदूरमधुन अटक करण्यात आली असून याबाबत मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचे ट्विट

Google News Follow

Related

देशावर हल्ला करण्याच्या तयारी असलेला एक संशयित फिरत असल्याचे मध्यंतरी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ एनआयएने समोर आणले होते. त्याला आता जेरबंद करण्यात आले आहे.  राष्ट्रीय तपास संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यप्रदेश पोलिसांनी काल रात्री इंदूर येथून  सर्फराज  मेमन या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत कि , सर्फराज  मेमन  संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नरोत्तम मिश्रा यांनी तसे ट्विट करत त्यात एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर मुंबई पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा इंदूरमधील ग्रीनपार्क कॉलनीमध्ये सर्फराजची चौकशी करत आहेत. याठिकाणी सर्फराजचे संबंध हॉंकॉंगशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पाकिस्तानसंबंधी काहीही सांगितले जात नाही आहे. आज मुंबई पोलीस आणि एनआयए चौकशीसाठी इंदूरला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे इंदूरमध्ये बॉम्ब निकामी पथकही सक्रिय झाले असून इंदूरमध्ये सगळीकडे डॉगस्क्वाडच्या मदतीने तपासणी चालू आहे. ग्रीन पार्क कॉलनीतील फातिमा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सरफराजचा मुलगा अहमद मेमन यानेच मुंबईतून मेसेज केला होता.

सर्फराज हा पाकिस्तान, चीन, आणि हॉंगकॉंग मधून प्रशिक्षण घेउन भारतात आल्याचा मुंबई एटीएसने ईमेल केला होता मुंबईत तो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता त्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी माहिती गोळा करून  सर्फराज अटक केले आहे. काल सोमवारी रात्री उशिरा चंदन नगर पोलीस स्थानकात त्याची चौकशी सुरु केली आहे. पण अजूनही दहशतवादी कारवायांबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही. सर्फराजने  चौकशीत  सांगितले  कि, त्याचे  खजराना येथे औषधाचे दुकान असून आता ते बंद झाले आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर तो हॉंकॉंगला गेला होता. तिकडे जवळ जवळ १२ वर्षे त्याने मोबाइल शॉप आणि रेस्टॉरंट चालवले आहे. पोलिसांना त्याच्या   हॉंगकॉंगचा पासपोर्ट सापडला आहे.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

त्यानंतर, तो हॉंगकॉंग मार्गाने पाकिस्तान आणि तालिबानच्या संपर्कात होता का? याचा सर्व पुढील तपास चालू आहे.
सर्फराजच्या हालचाली या संशयास्पद होत्या त्याची कागदपत्रे आल्यावरच तो घरी यायचा असे त्याच्या इमारतीतील रहिवाश्यांनी सांगितले आहे. शेजाऱ्यांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही.  सर्फराजने पाकिस्तान चे संबंध आहेत का ते बघत असून त्याने पाकिस्तानला गेला आहे का यावर नकार दिला आहे. तो हॉंगकॉंग मार्गे किंवा चीनमार्गे पाकिस्तानात गेला का याची पडताळणी चालू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या अहवालाची सुद्धा चोकशी करणार आहे. शांतता आणि सुव्यवस्थेच्या राज्यांत संशयास्पद कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणालाच सोडले जाणार नाही असे गृहमंत्र्यांनी म्हंटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा