31 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषठाकरे बंधू एकत्र, 'ब्रँड' ठाकरे जिंकणार, पण ते लोकांना आवडल्याचे दिसत नाही!

ठाकरे बंधू एकत्र, ‘ब्रँड’ ठाकरे जिंकणार, पण ते लोकांना आवडल्याचे दिसत नाही!

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पराभवावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया 

Google News Follow

Related

बेस्ट पतपेढी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणीत पॅनल आणि शशांक राव यांच्या पॅनल ला मोठा विजय मिळाला आहे. गेल्या ९ वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेल ला २१ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजपाप्रणीत पॅनेल विजयी झाले. दरम्यान, एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूना निवडणुकीत एकाही जागेवर यश न मिळाल्याने सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार टीका आणि टिप्पणी होत आहे.

अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, ‘ब्रँड’ ठाकरे जिंकणार, पण लोकांना ते आवडलेले दिसत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच याचे राजकीयकरण करायचे नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर बेस्टच्या झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला आहे आणि यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे, असा प्रश्न विचारला असता. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझे असे मत होते कि अशा प्रकारच्या निवडणुकीचे राजकीयकरण करण्यात येवू नये, ही पतपेढीची निवडणूक आहे. पण त्यांनीच त्याचे राजकीयकरण केले. शशांक राव आणि प्रसाद लाडही आमचेच आहेत, मात्र आम्ही कधीही राजकीयकरण केले नाही.

हे ही वाचा : 

भारताचे पर्यावरण संरक्षणात ऐतिहासिक पाऊल

११ वर्षांच्या मुलीला अ‍ॅमीबिक मेंनिंजायटिस

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची स्थिती बिकट

ईराणहून परतणाऱ्या ६४ स्थलांतरितांचा अपघातात मृत्यू

पण त्यांनी मात्र, आता दोन ठाकरे बंधू एकत्र-‘ब्रँड’ ठाकरे निवडून येणार, अशा प्रकारचं राजकीयकरण केलं. पण ते लोकांना काही आवडलेले दिसत नाही, असे दिसते. त्यांना एकही जागा मिळालेली नाही, यानिवडणुकी तरी त्यांना रिजेक्ट केल्याचे चित्र आहे. मला याचे काही राजकीयकरण करायचे नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा