28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेषसिंहाच्या पिंजऱ्यात माणसाने टाकला हात आणि....

सिंहाच्या पिंजऱ्यात माणसाने टाकला हात आणि….

Related

जमैका प्राणीसंग्रहालयातील एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिंहासोबत मस्ती करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्याच्या आत आपला हात घातला आणि त्यानंतर सिंहाने त्याचे बोट चावून तोडून टाकले आहे. महत्वाचं म्हणजे, हे सगळं घडत असताना अनेकजण तिथेच उभे राहून या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत होते.

जमैका प्राणीसंग्रहालयातील प्राणिसंग्रहालयाचा रक्षक सिंहाच्या पिंजऱ्यात वारंवार हात घालत होता. यामुळे सिंह त्याच्यावर धावून जात होता तरीही या रक्षकाने सिंहाच्या पिंजऱ्यात पुन्हा पुन्हा हात टाकणं सुरूच ठेवले. त्यानंतर सिंह गुरगुरला आणि संधी मिळताच त्याच्या हाताला चावा घेतला. तो रक्षक स्वतःचा हात काढण्याचे अनेक प्रयत्न करत होता तरीही सिंहाने त्याचा हात सोडला नाही. शेवटी त्याच्या हाताची बोटे तोडूनच सिंहाने त्याचा हात सोडला. विशेष म्हणजे, उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला मात्र त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे गेले नाही.

हे ही वाचा:

एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, एका तरुणाला अटक

वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास दिला नकार

हरियाणवी गायिकेची हत्या, दोघांना अटक

एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, एका तरुणाला अटक

एका उपस्थित व्यक्तीने याबद्दल सांगितले की, जेव्हा हे घडले तेव्हा मला वाटले की हा एक विनोद आहे. मला त्याचे गांभीर्य कळले नाही, कारण शो करणे हे त्यांचे काम आहे. मात्र, जेव्हा तो जमिनीवर पडला तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात आले की हे प्रकरण गंभीर आहे. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्याच्या हाताचा बोटांचा भागच सिंहाने चावून टाकला. प्राणीसंग्रहालयाने सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती नव्हती. परंतु जमैका सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्सद्वारे या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा