27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरविशेषचिमुकलीने जवानाच्या पायाला केला स्पर्श आणि....

चिमुकलीने जवानाच्या पायाला केला स्पर्श आणि….

Related

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक लहान मुलगी आणि काही जवानांचा हा व्हिडीओ आहे. एक चिमुकलीने या जवानांना खास अशा पद्धतीने आदर दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या चिमुकलीचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.

अनेकदा लष्कराचे जवान आपल्याला दिसतात, पण या वीरांना सलाम करणारे काही मोजकेच लोक असतात. त्यातलीच ही एक चिमुकली. या व्हिडीओमध्ये लष्कराचे काही जवान मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक मुलगी त्यांच्या जवळ धावते. यानंतर ती एका सैनिकाच्या पायाला स्पर्श करू लागते. हे पाहून सैनिकही आश्चर्यचकित होतात.

हे ही वाचा:

तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदींना अडकविण्यासाठी घेतले होते ३० लाख!

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

हा व्हिडीओ समोर येताच मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर कोणी विचारले की संस्कार काय आहे, तर त्याला हा व्हिडीओ दाखवा. संस्कार कन्येच्या वयापेक्षा मोठा आहे. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनीही हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी मुलीचे कौतुक केले आहे. तर तिच्या घरच्यांचेही असे उत्तम संस्कार दिले म्हणून कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा