महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरून एकत्र येण्यावरून सध्या राज्यभरात चर्चा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, एकेकाळी मनसेवर टीका आदित्य ठाकरे आज एकत्र येण्याची भाषा करत आहेत. यावरून भाजप त्यांच्यावर टीका करत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. मराठी माणूस, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेवून लढत राहू. आमचे दिपेश म्हात्रे आणि त्यांचे राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केले होते. लोकांच्या मनात काय आहे ते माहिती आहे, आमचे मन साफ आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येवून लढू, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर स्वागतच असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी म्हटले आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा :
अडीच लाख लोक आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी फक्त १ हजार पोलिस
प्री-डायबेटीसचा धोका कसा दर्शवला जातो!
अमेरिकन टॅरिफ बद्दल मेक्सिकन राष्ट्रपती काय म्हणाल्या ?
कारण आदित्य ठाकरेंनी बऱ्याचवेळा मनसे पक्षावर टीका केली होती आणि आता ते एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मागील काही वर्षांचे विधान पाहिले तर त्यांनी एकदा मनसेला टाईमपास टोळी असे म्हटले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या विधानावर बोट ठेवणे साहजिकच आहे. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत टोला लगावला. ते म्हणाले, संपलेला पक्ष म्हणून ज्याची खिल्ली उडवलेली त्यांच्याबरोबर एकत्र येण्याची भाषा करतायत, आरारा… काय वाईट दिवस आहेत.
संपलेला पक्ष म्हणून ज्याची खिल्ली उडवलेली त्यांच्याबरोबर एकत्र येण्याची भाषा करतायत, आरारा… काय वाईट दिवस आहेत ! pic.twitter.com/0iob5BwM6d
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 5, 2025
