रॉ़यल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) आयपीएल जिंकल्यानंतर त्याच्या जल्लोषासाठी बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी ११ लोकांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला. त्यावेळी फक्त १ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले होते की, ५ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
यासंदर्भात न्यायालयात सुनावणी होती त्यावेळी सरकारने जी आकडेवारी दिली त्यातून सरकारचाच खोटेपणा उघड झाला.
कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले की, एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीच्या दिवशी १,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात शहराचे पोलीस आयुक्त, डीसीपी आणि एसीपी यांचा समावेश होता. हे विधान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या त्या दाव्यानंतर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की ५,००० पोलीस कर्मचारी गर्दी व्यवस्थापनासाठी तैनात करण्यात आले होते.
सरकारने सांगितले की, पाण्याचे टँकर, अॅम्ब्युलन्स आणि कमांड-कंट्रोल वाहनेही तेथे उपलब्ध होती. मागील सर्व सामन्यांच्या तुलनेत अधिक चांगले नियोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा:
राहुल गांधींना मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे!
अमेरिकेने गाझामध्ये युद्धविरामाचा मसुदा प्रस्ताव व्हेटो केला
आगामी काळात IPO बाजार राहणार तेजीत
मृत्यूची माहिती असूनही सिद्धरामय्या हलवा खाण्यासाठी गेले!
३० हजार क्षमता आणि लोक आले अडीच लाख
तरीही, राज्य सरकारचे म्हणणे आहे की, परिस्थिती हाताबाहेर गेली कारण २.५ लाखांहून अधिक लोक स्टेडियमबाहेर जमा झाले होते. यापैकी अनेकांना असे वाटत होते की स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. मात्र, स्टेडियमची एकूण क्षमता ३५,००० असून, सहसा यामध्ये ३०,००० तिकिटेच विकली जातात.
न्यायालयातील सुनावणीचे तपशील
कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. काआमेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी.एम. जोशी यांच्या खंडपीठापुढे राज्याचे महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी उपस्थित होते. त्यांनी सांगितले, न्यायालय जे काही आदेश देईल, ते आम्ही स्वीकारायला तयार आहोत.
राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, लोक दुपारी १२ वाजेपासूनच स्टेडियमबाहेर जमा होऊ लागले होते, आणि दुपारी ३ पर्यंत परिसर पूर्णतः गोंधळलेला होता. गर्दीत इतर राज्यांतील लोकांचाही समावेश होता. शेट्टी यांनी नकाशा सादर केला, ज्यात मृत्यू गेट क्रमांक ७ (४ मृत्यू), गेट क्रमांक ६ (३ मृत्यू) आणि क्वीन रोडवर (४ मृत्यू) येथे झाल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयाने विचारले की, स्टेडियममध्ये एकूण किती गेट्स आहेत, तेव्हा सरकारने उत्तर दिले — २१ गेट्स असून ती सर्व खुली होती, आणि काही लोक आधीच आत बसले होते. न्यायालयाने विचारले की, गर्दी व्यवस्थापनासाठी कोणते SOP (मानक कार्यपद्धती) आहेत का? त्यावर शेट्टी यांनी उत्तर दिले की, हे उपाय भविष्यातील योजनांचा भाग आहेत आणि त्यावर सध्या काम सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नव्या SOP तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, आणि त्यावर काम त्या रात्रीपासूनच सुरू करण्यात आले आहे.
राज्य सरकारने न्यायालयाला हेही सांगितले की, RCB आणि त्यांचे इव्हेंट मॅनेजर्स तिकीट विक्री आणि गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळत होते. या प्रकरणी FIR नोंदवण्यात आले असून, संबंधित पक्षांना नोटिसा देण्यात आल्या आहेत — कोणतीही दुर्लक्ष झाल्याचे तपासले जाणार आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
