27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषराहुल गांधींना मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे!

राहुल गांधींना मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल 

Google News Follow

Related

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आसाम काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांना लक्ष करून पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केले आहे. पत्रकार परिषदेत सरमा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आणि दावा केला की ‘राहुल गांधींना मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे.’

माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सरमा यांनी आरोप केला की, राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने दोन्ही देशांमधील युद्धादरम्यान पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. राहुल गांधींचा रेकॉर्ड पहा. भारत पाकिस्तानशी युद्धात असताना त्यांनी कोणाला पाठिंबा दिला होता? त्यांच्या पक्षाने कोणाला मदत केली होती?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, ‘आसाममधील लोक अज्ञानी नाहीत. ते प्रादेशिक आणि राष्ट्रीय दोन्ही वृत्तवाहिन्या पाहतात. राहुल गांधींना मतदान करणे हे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे. काँग्रेस नेतृत्व स्पष्टपणे पाकिस्तान समर्थक आहे.’

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री योगी यांनी वाढदिवसाला लावली श्रीरामाच्या दरबारात हजेरी

‘सुपरबग’वर मात करण्यासाठी नवे तंत्रज्ञान

जागतिक पर्यावरण दिनी संकल्प प्लास्टिक प्रदूषण थांबवण्याचा

पाकिस्तानने नापाक कृत्य केल्यास घुसून मारू

दरम्यान, गौरव गोगोई यांनी अलिकडेच एका निवेदनात दावा केला होता की त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ‘मोठा फरक’ आहे. त्यांनी मुख्यमंत्री सरमा यांच्यावर हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप केला होता.

यावरून गौरव गोगोई यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री सरमा म्हणाले, ‘हो, माझ्यात आणि गौरव गोगोई यांच्यामध्ये खूप फरक आहे. माझ्या कुटुंबात कोणीही परदेशी नाही. मी संघर्षातून माझे राजकीय स्थान मिळवले आहे. माझे वडील मुख्यमंत्री नव्हते. माझ्या तोंडात चांदीचा चमचा नव्हता.’

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा