29.1 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषराज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त शंभर रुपयात मिळणार आनंदाचा शिधा!

राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त शंभर रुपयात मिळणार आनंदाचा शिधा!

आनंदाच्या शिधेत आता मैदा, पोह्याचा देखील समावेश

Google News Follow

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आनंदाच्या शिध्यात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र, आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. शिध्यात मैदा आणि पोह्याचा समावेश केला आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

हे ही वाचा:

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा