25 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरविशेषगाववाल्यानू आता जावा सुसाट...

गाववाल्यानू आता जावा सुसाट…

Google News Follow

Related

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या मार्गावरील कशेडी घाटातील बोगदा येत्या एप्रिलपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून आता आतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. हा घाट जवळ-जवळ १३ किमी इतका लांबीचा असून अवघड वळणामुळे आजतागायत येते अनेक अपघात झालेत. हा घाट पार करायला पाऊण तासांचा वेळ लागतं होता. आता हा केवळ सात ते आठ मिनिटांत पार करता येणार आहे. या घाटाला काही पर्यायी मार्ग व्हावा व हे अंतर कमी होण्यास मदत व्हावी या हेतून येथील डोंगरामधून हा बोगदा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकणात जाणारा सर्वात खडतर घाट अशी कशेडी घाटाची ओळख. कशेडीच्या अवघड आणि धोकादायक घाटातून प्रवास करणे म्हणजे कोकणवासियांसाठी डोकेदुखी. पावसाळ्यात दरडी कोसळून मार्गच बंद होणे हे नित्याचे होते. आता कोकणवासियांना हे चित्र बदललेलं दिसणार आहे. वळणदार कशेडी घाटात अपघातांमुळे अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुक कोंडी ही कोकणवासियांची डोकेदुखी ठरली आहे. हा घाट एकदाचा पार केल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो.

या कारणानेच या दोन्ही बोगद्यांचे काम २०१९ ला सुरु करण्यात आले. इंदापूर ते खेड हे ९० किलोमीटर अंतर आता चौपदीकरण होणार आहे. पोलादपूर ते खवटी दिवाण या ४० किमी कशेडी घाटाच्या चढ आणि उतारामुळे पार करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त अवधी लागत असे. मात्र या घाटातील दोन बोगद्यांमुळे हा प्रवास सात ते आठ मिनिटांत  आणि तोही सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या बोगद्यामुळे चार किलोमीटरचे अंतर वाचणार आहे शिवाय वेळेची बचत होणार आहे.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

बोगद्याचे जोड रस्ते आणि आतील रस्त्यांचे काम शिल्लक असून ते लवकरात लवकर पूर्ण करून प्रवशांसाठी कशेडी घाट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत खुला केला जाणार आहे. तब्बल ४०० कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. जवळपास २०० कामगार यासाठी दिवसरात्र काम करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा