33 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरदेश दुनियाछत्रपती शिवाजी महाराजांची 'ती' ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

शिंदे- फडणवीस सरकारचा निर्णय

Google News Follow

Related

राज्यातील शिवप्रेमींना शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. ब्रिटनमध्ये असेलली छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार महाराष्ट्रात परत आणली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. तलवार परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ब्रिटिशांनी दीडशे वर्षांच्या राजवटीत भारतातल्या अनेक ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेल्या. तर अनेक वस्तू ब्रिटिशांना भेट म्हणून सुद्धा देण्यात आल्या होत्या. यातील सर्वात अनमोल वस्तू ती म्हणजे मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इतिहासाची साक्षिदार आहे. ही तलवार राज्यात परत आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातं आहेत.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबद्दल विनंती केली. विशेष म्हणजे २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी सांस्कृतीक मंत्रालयाकडून मोठा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमापर्यंत जगदंबा तलवार ब्रिटनने दिली, तर हा आनंदोत्सव आणखी उत्साहात साजरा होईल.

याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाष्य केले होते. ब्रिटनमध्ये असलेली तलवार आणि उदयनराजे भोसलेंकडे असलेली तलावर, या दोन्ही तलवारी महत्त्वाच्या आहेत. इंग्रजांनी जे जे आपल्याकडून नेले, ते आणण्याचा प्रयत्न करणं योग्य असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे यासंदर्भात केंद्र सरकार विनंती करणार आहे. जगदंबा तलवार परत आणण्यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत पत्रव्यवहार केला जाणार आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

भारताचा पराभव; आठवण आली धोनीची

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही करवीरच्या छत्रपती घराण्याकडे होती. १८७५-७६ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर चौथे छत्रपती महाराज राज्य करत होते. यावेळी त्यांनी एडवर्ड यांना ही तलवार भेट म्हणून दिली होती. सध्या ही तलवार इंग्लडच्या राणीच्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेसमध्ये आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,974अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा