दहशतवाद्यांनी बंदुकीच्या मागील बाजूने मारहाण करून हिंदू आणि मुस्लीम लोकांना वेगळे केले. जे हिंदू आहेत त्यांनाच मारलं आणि धर्म विचारून मारलं. धर्म विचारून खरचं मारलं का?, असे प्रश्न पडणाऱ्या राजकारण्यांनी आमच्या समोर यावे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत, कारण आमच्यासह लहान मुले साक्षीला आहेत, असे पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांनी म्हटले.
पहलगाम हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला होता. यावरून देशभरात अजूनही संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, विरोधकांमध्ये असेही नेते आहेत ज्यांना या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. धर्म विचारून खरचं हल्ला केला का?, असा सवाल ते उपस्थित करत आहेत. याचे कारण म्हणजे, देशात हिंदुत्ववादी भाजपा सरकार आहे, त्यामुळे अशा नेत्यांना प्रश्न पडत आहेत. दरम्यान, असे प्रश्न पडणाऱ्या राजकारण्यांना जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांनी चोख प्रत्युत्तर देत, यासाठी समोर येण्याचे आवाहन केले आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, धर्म विचारून मारला हे सर्वजण बोलत आहेत, ते वेडे नाहीयेत. धर्म विचारला का?, धर्माचा कशाला प्रचार करता?, असे बोलून राजकारणी लोक आम्हाला ट्रोल करत आहेत. त्यांना मी सांगेन, धर्म विचारूनच माझ्या पतींसह इतरांना मारले आणि आमच्या हे डोक्यात फिक्स बसले आहे. त्यांच्यामुळे आम्हाला डोक्यावरील टिकल्या काढाव्या लागल्या. पण माझे पती हल्लेखोरांसमोर ‘अल्लाहु अकबर-अजाण’ नाही म्हणाले.
त्या पुढे म्हणाल्या, ते माझ्या मुलीला सांगायचे कि मला खाटाला खिळून मरायचे नाही, तुम्ही सरकारला सांगून मला बॉम्ब लावून दहशतवाद्यांच्या तळावर टाका, कमीत-कमी ५०-१०० अतिरेकी मी मारून मरेन. पण आज त्यांचे बलिदान वाया गेले नाही. पंतप्रधान मोदींनी याचा बदला घेतला आणि १०० दहशतवाद्यांन मारले. आज माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा :
वाराणसीत पाकिस्तान व तुर्कीच्या विरोधात शवयात्रा
जन औषधी केंद्र ठरतेय जनतेसाठी वरदान
आता देशात प्रत्येक पंचायतीत ‘पैक्स’ची स्थापना
राहुल गांधींनी राजकारणापासून दूर राहावे
विरोधकांवर टीका करताना त्या म्हणाल्या, २६/११ चा आतापर्यंत कोणी बदला घेतला का?. पण आता आलेल्या मोदी सरकारवर आमचा विश्वास आहे, कारण ते प्रत्येक हल्ल्याचा बदला घेतच राहतील. तुम्ही २६ मारलेत तर ते एक हजार मारतील, हे पाकिस्तानने डोक्यात ठेवावं.
त्यावेळी मी सहा जणांना मारलेलं समोर बघितले आणि हे मोदींना जावून सांगा, असे दहशतवादी आम्हाला सांगितले. त्यानंतर सांगितले आम्ही मोदींना आणि त्यांनी त्याचे प्रत्युत्तर दिले. आता आपल्या हिंदुनी एकत्र होवून लढण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या निर्णयाबरोबर राहणे ही काळाची गरज आहे. मोदींसारखी पाऊले कोणीही उचलू शकत नाहीत.
