28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषम्हैसूर: ड्रेनेजच्या खोदकामात ११ व्या शतकातील तीन जैन शिल्पे सापडली!

म्हैसूर: ड्रेनेजच्या खोदकामात ११ व्या शतकातील तीन जैन शिल्पे सापडली!

ही शिल्पे म्हैसूरच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालयात हलवली

Google News Follow

Related

म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा शहरातील आंबेडकर रोडवर ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम करणार्‍या नगरपालिकेच्या कामगारांना जैन धर्मातील तीन शिल्पे आढळून आली.या परिसरात जैन मूर्ती अचानक सापडल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण, श्रीनिवास एम.यांच्या अहवालानुसार, या परिसरात कोणतेही शिलालेख नाहीत. दरम्यान, खोदकाम करताना सापडलेल्या जैन मूर्ती ११ व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ह्या एकूण तीन मूर्ती असून यामध्ये एक कुष्मंडिनी देवीची आहे, तर इतर दोन जैन तीर्थंकरांची आहेत.एका मूर्तीचे पाय आणि हात तुटलेले आढळले तर एका मूर्तीचे फक्त डोके होते.या सर्व मूर्ती ११ व्या शतकातील आहेत.या तीन पुरातत्वीय वस्तू पुढील तपासणीसाठी शहरातील संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, ड्रेनेजच्या कामासाठी अर्थ मूव्हरचा वापर करून खोदकाम चालू होतं.खोदकाम दरम्यान सुमारे तीन फूट खोलीवर या तीन मूर्ती सापडल्या.तत्काळ सर्व उत्खनन थांबवण्यात आले आणि राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

सरत्या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला देशाच्या यशाच्या आलेखाचा आढावा

भविष्य उज्जवल आहे… आता दहशतवादीच पाकिस्तानला पोसणार!

जम्मू-काश्मीरची ‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

तज्ञांच्या मते, ही शिल्पे इसवी सन ११व्या शतकातील आहेत . गंगा आणि होयसाळ राजवटीत वरुण, वरकोडू आणि वाजमंगला ही म्हैसूरची महत्त्वाची जैन केंद्रे होती आणि या तीन मूर्ती त्या काळातील असल्याचे मानले जात आहे.

कर्नाटक पुरातत्व संग्रहालये आणि वारसा विभागाच्या संचालक मंजुला सीएन यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मंजुला सीएन यांनी या शिल्पांचे संवर्धनकरण्यासाठी संग्रहालयात हलवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.त्यानंतर ही शिल्पे म्हैसूरच्या इर्विन रोडवरील इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्राहालय (IGRMS) येथील संग्रहालयात हलवण्यात आली आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा